परिशिष्टे - Page 552

५१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

शूद्र ब्राह्मण होतो. याचे कारण अजून असे आहे कौ एखादा शूद्र देखील

काय? कारण मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे-- |

अरणीच्या गर्भातून जन्मलेला महान ऋषी * कठ ' आपल्या तपश्चर्येने ब्राह्मण बनला. म्हणून जाती हे ब्राह्मणत्वाचे कारण नव्हे. केवट स्त्रीच्या पोटी जन्मलेला व्यास एक महान ऋषी झाला. म्हणून जन्म हे ब्राह्मणत्वाचे कारण नव्हे. उर्वशिचा पुत्र वशिष्ठ आपल्या तपाने ब्राह्मण बनला म्हणून ब्राह्मणत्त्वाचे कारण नव्हे. हरिणीगर्भातून जन्मलेला पुत्र ऋष्यशुंग आपल्या तपाने महान बनला म्हणून जन्म हे ब्राह्मणत्वाचे कारण नव्हे. चाण्डाळ स्त्रीच्या गर्भातून जन्मलेला विश्वामित्र एक महान ऋषी बनला म्हणून जन्म है ब्राह्मणत्वाचे कारण नव्हे. ताण्डुलीचा पुत्र नारद आपल्या तपाने महान ऋषी बनला म्हणून त्याची जात ब्राह्मणत्वाचे कारण नव्हे. शील आणि सदाचाराने युक्त असलेला संयमी, आत्मसंयम आणि आत्मदमन केलेल्या मनुष्यच जितेन्द्रिय होतो. मनुष्य हा तपामुळे तापस आणि ब्रह्मचर्याने ब्राह्मण बनतो. या जगात केवळ ब्राह्मण - स्त्रीच्या पोटी जन्मल्याने कोणीही ब्राह्मण बनत नसतो. त्या (कठादि) महापुरूषांच्या माता ब्राह्मणी नव्हत्या. परंतु लोकांसाठी ते ब्राह्मणच ठरले होते. सदाचार आणि पावित्र्यामध्ये ब्राह्मणत्व साठवले आहे. म्हणून ब्राह्मणत्वाकरिता जन्म हे कारण ठरत नाही. जन्म किंवा वंशाला प्राधान्य नसून फक्त शीला (सदाचारा) लाच प्राधान्य आहे. मनुष्य जर सदाचारपतित असेल तर त्याच्या जाती किंवा वंशाचे काय करायचे? कारण शील संपन्न परंतु निम्नकुलात जन्मलेले अनेक लोक स्वर्गात गेलेत.

२८. किं चाप्यन्यद भवदीय मतं-

-मुखतो ब्राह्मणो जातो बाहुभ्यां क्षत्रियथ्तथा।

उरूभ्या वैश्यं: संजातः पदभ्यां शूद्रक एव च ।।३०।।

य़ा व्यतिरिक्त आपले वेगळे मत आहे काय? जसे की-

ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रिय भुजातून जन्मलेत, वैश्य जांघेतून आणि

शुद्र पायातून जन्मलेत.

२९. अत्रोच्यते। ब्राह्मणा बहवो न ज्ञायन्ते कुतो मुखतो जाता ब्राह्मणा

इति। इह हि कैवर्तरजक चण्डाल कुलष्वपि बाह्मणा: संति। तेषामपपि

चूडाकरणमुंजदण्ड काष्ठादिभिः संस्काराः क्रिंयन्ते। तेषामपि

ब्राह्मणसंज्ञा क्रियते। सस्माद ब्राह्मणवत्क्षत्रियादयोऽपीति पश्याम

एकवर्णो नास्ति, चातुर्वर्ण्यमिति!

येथे यासंबंधी असे म्हटले जाते. अशाप्रकारे अनेक प्रकारच्या ब्राह्मणांच्या अस्तित्वाची माहिती मिळते. त्यामुळे मुखातून जन्मलेला ब्राह्मण कुठे आहे