परिशिष्टे - Page 553

परिशिष्टे | . ५११

याचा पत्ताच लागत नाही. केवट, धोबी आणि चाण्डाळ कुळात जन्मलेले ब्राह्मणदेखील अस्तित्वात आहेत. sor 'आहुती' देणे आणि यज्ञोपवीत (जानवे) इत्यादी पुण्यानुष्ठानाची ब्राह्मणोचित क्रियाकर्म त्यांच्यासाठी देखील केली जातात. ते देखील ब्राह्मण गणले जातात म्हणून ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रीय आणि वैश्यदेखील एकाच वर्णाचे (एक सारखेच) वाटतात म्हणून चार वर्ण नसून एकच वर्ण आहे

३०. अपि च] एकपुरुषोत्पज्ञां कथं चातुर्वण्यम्‌ इह कश्चिद्देवदत्त एकस्यां

स्त्रियां चतुरः पुत्रां जनयति। न च तेषां वर्णभेंदोस्ति। अयं ब्राह्मणोऽयं

क्षत्रियोऽयं वैश्योऽयं शूद्र इति। कस्मात्‌ एकपितृकत्वाद्‌ । एवं

बराह्मणादींना कथं चातुर्वण्यम्‌ |

आणि मग एकाच माणासापासून (ब्राह्मापासून) जन्मलेल्या लोकांमध्ये चार जाती (वर्ण) कशा राहू शकतात? देवदत्त नावाचा एखादा मनुष्य आहे की, ज्याच्या पासून एखाद्या स्त्रीच्या पोटी चार पुत्र जन्मतात. त्यापुत्रांमध्ये वर्णाच्या आधारावर भेद (फरक) नसतो. त्यांना हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य आणि हा शूद्र असे कसे म्हणता येईल? - तर ते एकाच पित्यापासून जन्मले आहेत म्हणून, असे असतांना ब्राह्मणादि चार जाती कशा असू शकतील?”

~

ww

` : - लोखंडे, पृ. १-४, १४-१५ आणि २९-३१.