परिशिष्टे - Page 554

परिशिष्ट-१४
महाराज सयाजीराव गायकवाड

श्रीमंत सयाजीराव महाराजांचा जन्म १७ मार्च १८६३ रोजीं नाशिक जिल्ह्यांत मनमाडपासून सुमारे १८ मैलांवर असलेल्या कवळाणें नांवाच्या गांवी झाला. सयाजीराव हे गायकवाड घराण्यांतील सुप्रसिद्ध दमाजी गायकवाड यांच्या प्रतापराव नावांच्या भावापासून पांचव्या पिढींतील काशीराव गायकवाड यांचे द्वितीय चिरंजीव होत. सयाजीराव महाराज यांचे वडील काशीराव यांची स्थिती श्रीमंतीची नव्हती; परंतु तें कुटुंब कवळाणें गांवी कुलीन, AGEN, खाऊनपिऊन सुखी म्हणून मानले जात असे. काशीरावांचे दोघे बंधू उखाजी व सखारामराव यांनी. गरिबीस ,कंटाळून व बडोद्याच्या गायकवाडाशी असलेले आपले नातें लक्षात घेऊन त्यांची भेट घेतली. मल्हारराव गादीवर आल्यावर पुनरपि उखाजींने त्यांची भेट घेतली व त्यांनींहि त्यास पोषाख देऊन भरदरबारात उखाजीचा बहुमान करण्याचा विचार ठरविला; परंतु उखाजीने हा मान आपला वडील भाऊ काशीराव यास मिळावा अशी इच्छा दर्शविल्यावरून मल्हारराव यांनी काशीराव यास आणवून पोषाख व थोडे पेन्शन देऊन त्याची बोळवण

केली.

काशीरावास आनंदराव, गोपाळराव व संपतराव असे तीन पुत्र होते. गोपाळराव म्हणजेच श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज होत. गायकवाड घराण्याशी संबंधीत बडोदा आणि कवळाणें येथील मुलांची चौकशी करून त्यातील गोपाळराव यांस ता. २७ मे १८७५ रोजी पसंत करुन सयाजीराव या नांवानें दत्तक विधिपूर्वक घेण्यात आले.

इ. स. १८८१ च्या डिसेंबर महिन्यात महाराजांचा शिक्षणक्रम संपला. इलियट या इंग्रज साहेबांच्या शिक्षणाचा महाराजांच्या मनावर योग्य सुपरिणाम झाला. कांहींच्या मतें आंग्लविद्येने भारल्यामुळें महाराज नास्तिक बनले. पण महाराजांस सर्वागीण शिक्षण मिळालें, ही गोष्ट कोणासहि नाकबूल करतां येणार नाही. महाराजांची बुद्धि जशी चौरस तशी त्यांची दृष्टीही व्यापक परंतु सूक्ष्म होती. इंग्रजी शिक्षणानें व इतिहासाच्या परिशीलनानें त्यांच्या बुद्धीचा विकास झाला. स्वतंत्र विचार करण्याची शक्ति त्यांस प्राप्त झाली. बुद्धिरूपी तराजूत प्रत्येक बाब तोलून जिकडे तिकडे तिचा (बुद्धीचा) कांटा झुकेल तीच गोष्ट करण्याची त्यांस संवय झाली. दृढनिश्चय, उद्यमशीलता, बाणेदारपणा,