परिशिष्टे - Page 555

परिशिष्टे ५१३

कडक शिस्त, दुसऱ्यास हुकूमात ठेवण्याची कला या गोष्टी ते आपल्या

युरोपियन शिक्षकापासून शिकले. राजकीय परिस्थितीचें यथायोग्य आकलन व निरीक्षण करून त्यांतील व्यंगें काढून टाकून सुयंत्रित कारभार चालविणें हें त्यांचे ध्येय ठरलें. केवळ रुढी, अंधश्रद्धा किवा परपरागत समजूत म्हणून एखादी गोष्ट मान्य करावयाची नाहीं, तर सुराज्यास परिपोषक असें असेल व बुद्धीस पटेल तेवढेच ठेवावयाचें, निरुपयोगी भाग नाहींसा करावयाचा हे धोरण महाराजांनी आखलें. "आजकालच्या* बडोद्यातील सुधारणा म्हणजे महाराजांस मिळालल्या सुशिक्षणाचें दृश्यफल होय हें कोणीही कबूल करील. एवढेच नव्हे तर त्यानंतर आपल्या निधनापर्यंत संस्थानाच्या सर्वागीण उन्नती करिता एक आदर्श लोककल्याणकारी राजा म्हणून आपले स्थान ठेवले आहे. ते ५ मार्च १९०७ च्या भाषणात स्पष्टपणे म्हणतात, “प्रजेचे कल्याण हेंच माझे कर्तव्य व तोच माझा मोक्ष” शिक्षण सार्वत्रिक असण्यामागील आपले विचार स्पष्ट करताना ते १९ जून १९०४ च्या भाषणात म्हणतात, “विद्या ही एकाच व्यक्तीला किंवा वर्गाला, फार तर काय एकाच समाजालाहि मिळून फायदा नाही. ती सार्वत्रिक असली पाहिजे, तरच आपले पाऊल पुढें पडणार आहे हें लक्षांत ठेवा. सर्व राष्ट्राचा उत्कर्ष पाहिजे आहे, तो एका समाजानें साधणार नाहीं. लहानापासून थोरापर्यंत सर्वच विद्या शिकलेले होतील असें करण्यास तुम्ही झटलें पाहिजे; तरच राष्ट्र पुढें जाईल ..... जन्माने कोणी मोठें नाही, हें तुम्ही मनांत वागवले पाहिजे. खेड्यांपाड्यांतून सुद्धां हे विद्याप्रसाराचे काम अव्याहत व gia चाललें पाहिजे. आपल्या देशांत महारापोरांपासून तो अगदी वरच्या पायरीपर्यंतच्या सर्व लोकांना कार्यकारण भाव समजूं लागेल तर आपला उजितकाल जवळ आला आहे असे म्हणण्यास कांहीं हरकत नाही.”

शिक्षणाची अनिवार्यता विशद करताना ते म्हणतात, “ Education is : absolutely necessary for the realisation of my ambition and wishes and for the success of my policy.”

“Education is the basis of all reforms and is the only way of solution from our present condition.” |

“भारतीय संस्थानिकांपैकी पुण्यश्लोक सयाजीराव गायकवाड यांचे अस्पृश्यता निवारण्याच्या क्षेत्रातील कार्य मोठे भरीव नि परिणामकारक ठरले. असा प्रजाहित दक्ष, ज्ञानदाता नि प्रगतिप्रिय नरेश अर्वाचीन भारतात क्वचित झाला

* ड, सन १९३३ पर्यंत म्हणजेच महाराजांच चरित्र लिहित असें पर्यंत.

१ , श्री. सयाजी गौरव ग्रंथ - १९३३.