५१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असेल. स्पृश्य हिंदूंच्या हृदयशुन्यतेमुळे अस्पृश्यांकरिता काढलेल्या शाळेसाठी स्पृश्य हिंदू शिक्षक मिळेनात, म्हणून सयाजी महाराजांना मुसलमान शिक्षक नेमावे लागले.”
महाराजांनी केवळ विचारच मांडले नाही तर त्यानुसार कृतीही केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील खालील प्रसंग या संदर्भात उद्बोधक ठरावा. |
“वडिलांच्या मृत्युमुळे भीमराव आंबेडकरांचा होता नव्हता तो आधार लुटला. पैशाचे पाठबळ नाही, आप्तांचा आधार नाही, अशी परिस्थिती. बडोद्यात नोकरीवर रुजू .होण्यासारखी त्यांची मनःस्थिती नव्हती. त्या नोकरीतील अनुभवही काही चांगला नव्हता. आता त्यांना स्वतःच्या पायावर उभ राहण्यावाचून गंत्यंतर नव्हतें. त्यांच्या ठायी ज्ञान संपादन करण्याची अनिवार इच्छा होती. जगात काही महत्तम कार्य करावे, अशी त्यांची अबोल महत्त्वाकांक्षा होती. त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ होई. कुटुंबाचे पालनपोषण तर केले पाहिजे.. आणि शिक्षण पुढे चालवावे म्हटले तर पदरी कवडीदेखील नाही. वडिलांचा शेवट कर्जबाजारीपणात झालेला. अशा प्रकारे जीवनकलहाच्या तीव्र धुमाळीतून मार्ग कसा काढावा, ह्या विवंचनेत असताना ते बडोदा नरेशांना मुंबईत भेटले. त्या सुमारास बडोदे सरकारने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन चार विद्यार्थी अमेरिकेस पाठविण्याचा विचार केला होता. महाराजांनी शिष्यवृत्तीसाठी भीमरावांना अर्ज करण्यास सांगितले. त्या
चार विद्यार्थ्यांत त्यांनी भीमराव आंबेडकरांची निवड केली.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्तिय उत्क्रांती'
(दी इव्हेल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्शल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) या नावाने . प्रसिद्ध. ग्रंथाच्या प्रती - नियमाप्रमाणे कोलंबिया विश्वविद्यालयाला सादर करताच
त्या विश्वविद्यालयाने रीतसर त्यांना 'डॉक्टर ऑफ फिलासॉफी' ही अत्युच्य
पदवी. दिली, उपरोक्त प्रबंध डॉ. आंबेडकरांनी श्रीमंत सयाजीराव महाराज ह्यांना
त्यांजविषयीच्या आपल्या कृतज्ञतेचे द्योतक म्हणून अर्पण केला.
पहिल्या गोलमेज परिषदेकरिता श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे सुद्धा गेले
होते. त्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेहि भाषण झाले. त्या भाषणाने
१; महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७ वा, पृ. ६४४, उद्घृत - कीर, पृ. ५.
२: कीर, पृ. ३१.
3 : ततैव्य, पृ. ३४-३५. .