आंबेडकर लेखन आणि भाषणे ५२० डॉ. बाबासाहेब
नसतानाही इटलीची लष्करी तयारी संपूर्ण पाठिंबा दिला. व अन्य धोरणास त्याने
युद्धप्रवेशानंतर इटलीच्या उडी घेतली. अमेरिकेच्या त्याने दुसऱ्या महायुद्धात
यामुळे लागली. महायुद्ध आणि साम्राज्यवादी धोरण सैन्याची पीछेहाट होऊ
जनसामान्यावरील कराचा बोजा वाढला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची गळचेपी झाली. तेव्हा संत्रस्त जनतेने मुसोलिनीच्या राजीनाम्याची मागणी केली. फॅसिस्ट पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. आवाक्याबाहेरच्या अंतर्गत परिस्थितीचा विचार करून मुसोलिनीने राजीनाम दिला. त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली; परंतु जर्मन सैनिकांनी त्यांची सुटका केली. जर्मनव्याप्त उत्तर इटलीत काही दिवस फॅसिस्ट पक्षाद्वारे त्याने राज्य केले; परंतु जर्मनीचा पराभव होताच तो निष्प्रभ झाला आणि २८ एप्रिल १९४५ रोजी त्याने स्वित्झर्लडमध्ये पळून जाण्याची योजना आखली; पण विरोधकांनी त्याला पकडले आणि दाँग्गा (कोमो) येथे कॅल्रेता या प्रेयसीसह
त्याला गोळ्या घालून ठार मारले.
युरोपीय राजकीय संस्कृतीच्या संदर्भात फॅसिझमचा पराभव झाला. प्राचीन
रोमन साम्राज्याचे स्वप्न आणि त्याची उग्र राष्ट्रवाद व सैनिकी सामर्थ्य ही साधने विसाव्या शतकातील युरोपीय संस्कृतीशी विसंगत ठरणारी होती; कारण या शतकात ब्रिटिशादिकांची साम्राज्येच खिळखिळी होत आली होती. प्रादेशिक
विस्तारवाद राष्ट्रराज्याच्या उदयामुळे अशक्यप्राय आणि अन्याय्य ठरत होता. खुद्द इटली लष्करी दृष्ट्या पुरेसा सामर्थ्यवानही नव्हता. इतिहासाचा रोख व
दिशा यांच्या अज्ञानाच्या त्या निदर्शक होत्या. हुकूमशाही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे शेवटचे एक नमुनेदार स्वरूप मुसोलिनीच्या चरित्रातून दिसून
येते. तथापि, त्यातही समाजवादाकडून अवचितपणे हुकूमशाही महत्त्वाकांक्षेकडे
झालेले त्याचे परिवर्तन हे त्याच्या चरित्रातील एक कायमचे रहस्य ठरेल. मात्र
मुसोलिनीप्रणीत फॅसिझमच्या प्रवृत्तीला लोकशाही मूल्यांनीच शह देता येईल,
हेही जागतिक इतिहासात त्याच्याच चरित्राने सुचवून ठेवले आहे. त्याचे
विविध वृत्तपत्रातून कामगार चळवळ व समाजवादाचे समर्थन करणारे तसेच
समाजवाद विरोधी व राष्ट्रीयत्त्वाचे प्रतिपादन करणारे - फॅसिस्ट प्रवृत्तीचा
प्रसार करणारे अनेक प्रखर व जहाज लेख प्रसिद्ध झाले. त्याने आत्मचरित्र
(१९२८) लिहले. त्याची पत्रे पुढे प्रसिद्ध झाली.
छ ७ &
मराठी विश्वकोश : १३, पृ. ७८३-७८४.