परिशिष्ट-१६
फॅसिझम
इटलीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेली एक सर्वकष सत्तावादी आधुनिक राजकीय विचारप्रणाली. इटलीत अडचणीच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीत फॅसिझम निर्माण झाला. बेनीतो मुसोलिनीने त्या नव्याने वाढणाऱ्या चळवळीचें व संघटनेचे नेतृत्व केले. मुसोलिनी सुरुवातीला समाजवादी होता. समाजवादी पक्षाचे मुखपत्र अवंती (Avanti) या दैनिकाचा तो संपादकही होता; परंतु नंतर त्याचे मन बदलले आणि तो समाजवादाला कडवा विरोध करणाऱ्या फॅसिस्ट पक्षाचा निर्माता आणि पुढारी झाला. हे १९२० च्या सुमारास घडले. फॅसिझम हा शब्द 'फॅसिओ' वरून निघालेला आहे. फॅसिओ म्हणजे लाकडांच्या जुडीमध्ये बांधलेली कुऱ्हाड, रोमन साम्राज्याचे ते चिन्ह होते. फॅसिझमचा पुढे वाढलेला साम्राज्यवाद आणि युद्धखोर वृत्ती यांचा त्या चिन्हाने चांगला बोध होतो.
मुसोलिनीने उभारलेल्या फॅसिस्ट पक्षात मुख्य भरणा होता, तो बेकार कामगारांचा
आणि मध्यम वर्गातील दिशाहीन तरुणांचा. सुरुवातीला हा पक्ष लहान
होता. भांडवलदारांच्या व इतर श्रीमंत मंडळींच्या पाठींब्यामुळे तो हलके हलके वाढल गेला; पण त्याची खरी वाढ झाली, ती राजकीय सत्ता हातात आल्यानंतर. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी फॅसिस्टांनी २८ ऑक्टोबर १९२२ रोजी राजधानीच्या रोम शहरावर मोर्चा काढला. या रोम शहरावरील मोर्चाचा फॅसिस्ट चळवळीत “मोठी वीरश्रीची घटना” म्हणून उल्लेख होतो; परंतु त्या मोर्चामध्ये वीरश्री दाखविण्याचे कारणच पडले नाही. मोर्चाला कुणाचाही विरोध झाला नाही. फॅसिस्टांना रोममध्ये बिनविरोध प्रवेश मिळाला आणि राजाने आपण होऊन राजसूत्रे मुसोलिनीला बहाल केली. मुसोलिनी राजाच्या आमंत्रणावरून देशाचा मुख्यमंत्री बनला आणि तेव्हापासून इटलीमध्ये फॅसिस्ट राजवट सुरू झाली.
या काळात इटलीमध्ये समाजवादी, साम्यवादी व अराज्यवादी असे वाममागी पक्ष होते. याखेरीज उजव्या विचारसरणीचे व मध्यम मागचि असे इतरही काही पक्ष होते. या सर्व पक्षांच्या सभासदांची संख्या फॅसिस्ट पक्षाच्या सभासदांपेक्षा कितीतरी अधिक होती. सर्वांनी मिळून एकजुटीने फॅसिस्ट