परिशिष्टे - Page 564

422 डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पक्षाचा विरोध केला असता, तर त्या पक्षाचे पाऊल पुढे पडले नसते; पण ते सर्व पक्ष एकमेकांत भांडत होते, विशेषत: समाजवादी व साम्यवादी पक्षांतील भांडण अत्यंत तीव्र होते. त्यामुळे ते नामोहरम झाले आणि देशात फॅसिस्ट पक्षाची हुकूमशाही स्थापन झाली. “4

सत्ता हाती आल्याबरोबर मुसोलिनीने विरोधकांचा छळ सुरू केला. भाषणस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य इ. नष्ट केले आणि मुसोलिनी व त्याचा पक्ष यांच्याविरूद्ध ब्र काढणेही अशक्य झाले. विरोधकांची धरपकड चालूच होती, यावेळी मुसोलिनीने विरोधकांना जबरदस्तीने एरंडेल तेल पाजण्याचे नवे तंत्र सुरू केले. अनेक विरोधक या जाचाला कंटाळून देश सोडून गेले, अनेकांना वर्षानुवर्ष goia खितपत पडावे लागले. तरीदेखील थोडासा विरोध झालाच; पण फॅसिस्टांनी पाशवी उपायांचा अवलंब करून तो चिरडून टाकला.

राज्यसत्ता हातात आली, त्या वेळी लोकसभेत फॅसिस्ट पक्ष अल्पसंख्य होता. एकदोन वर्षांत मुसोलिनीने राज्यघटना बदलली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फॅसिस्ट १००% निवडून आले. त्या निवडणुकीची तर्‍हा मोठी वेगळी होती. फॅसिस्ट पक्षाने तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीवर “होय किंवा नाही' एवढेच जाहीर करण्याचा मतदारांचा हक्क होता आणि तो हक्क देखील त्यांनी उघडपणे बजावला पाहिजे, अशी योजना होती. म्हणजेच मतदान गुप्त नव्हते, शिवाय मतदान आपल्या बाजुने व्हावे, म्हणून फॅसिस्ट गुंडांची धाकदपटशाही आणि गुंडागिरी होतीच. निकाल अर्थातच त्यांच्या बाजूने लागला. |

मुसोलिनीचा लोकशाही राज्यव्यवस्था आणि लोकशाही हक्क यांवर विश्वास नव्हता. लोकशाहीमुळे देशामध्ये नाना पक्ष आणि पंथ माजतात, त्यामुळे देश विस्कळित होतो व त्याला कोणतेही निश्‍चित धोरण आखता येत नाही, असे त्याचे मत होते. लोकशाही स्वातंत्र्यामुळेही तेच घडते, असेही त्याला वाटत होते. म्हणून देशाचा .कारभार सुरळीत रीतीने चालावयाचा आणि देशाची प्रगती व्हावयाची तर देशामध्ये एकच पुढारी असला पाहिजे व देशातील सर्व कारभार त्याच्या एकट्याच्या मर्जीनुसार चालला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. म्हणूनच त्याने एकतंत्री राज्यकारभार सुरू केला आणि त्या कारभाराला कुणाचाही विरोध होऊ नये, म्हणून हुकूमशाही स्थापन केली. देशामध्ये एकच पुढारी असला पाहिजे म्हणून तो राज्याचा सर्वाधिकारी व पक्षाचा एकमेव नेता बनला. फॅसिस्ट पक्षाखेरीज इतर सर्व पक्ष त्यान बेकायदा ठरवले व