परिशिष्टे l 423
देशातील सर्व राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संस्था आपल्या पक्षाच्या हुकूमतीखाली आणल्या.
फॅसिझमला, फॅसिस्ट पक्षाला व मुसोलिनीला इटलीमध्ये सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला. त्याचे मुख्य कारण हे की लोक तत्कालीन दुरावस्थेला, शासनाच्या दुबळेपणाला व समाजातील गोंधळला कंटाळले होते. त्यांना स्थिर व. समर्थ सरकार हवे होते. असे सरकारच आर्थिक अरिष्टातून मार्ग काढून उद्योंगधंदे वाढवू शकेल, बेकारी दूर करू शकेल व राष्ट्राचे नाव उज्ज्वल करू शकेल असे त्यांना वाटत होते. पहिल्या महायुद्धात विजयी राष्ट्रांच्या बाजूने युद्धात भाग घेऊनही हवा असलेला मुलूख पदरात पडला नाही. म्हणून इटलींचा मोठा मानभंग झाला होता. या सर्व बाबतीत मुसोलिनीने व फॅसिस्ट पक्षाने मोठी आकर्षक आश्वासने दिली. लोक त्यामुळे भुलले व त्यांनी फॅसिझमला पाठिंबा दिला. पुढे ती आश्वासने फसवी ठरली, ही गोष्ट वेगळी.
शिवाय देशांमध्ये लोकशाही परंपरा नव्हती. 'राजा, सरदार, चर्च व वरिष्ठवर्ग यांचे लोकांच्या मनावर खूप दडपण होते. त्यांनी राज्य करावे व आपण आपली परंपरागत शेती करावी किंवा कारखान्यात अगर लहान-सहान उद्योगात काम करावे, अशी लोकांची भावना होती. प्रत्येक बाबतीत त्यांना कुणीतरी पुढारी हवा असे व त्या पुढाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावे अशी त्यांची वृत्ती होती. त्यांना स्वास्थ्य व सुरक्षितता हवी होती. स्वातंत्र्याबद्दल त्यांचा विशेष आग्रह नव्हता. लोकांच्या या मनोवृत्तीचा मुसोलिनीने फायदा घेतला आणि त्यांना फॅसिझमच्या दावणीला जुंपले.
आधुनिक जगात ही मनोवृत्ती अनेक समाजांत दृष्टीस पडते. उत्पादन यंत्रणा प्रंचड वाढलेली आहे, राज्यसत्ता खूप प्रबळ झालेली आहे व समाज फार विस्कळित झालेला आहे, त्यामुळे व्यक्तीला हतबल झाल्यासारखे वाटते. त्याला एकलेपणाची व स्वातंत्र्याची भीती वाटू लागते, तो आधार शोधू लागतो. तो आधार त्याला पुष्कळ वेळा बलदंड पुढाऱ्यात आणि त्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखालील veda राज्यअवस्थेत आढळतो. अलीकडील समाजातील या समस्येचे एरिख फ्रॉम या सामाजिक तत्त्वज्ञाने आपल्या फीअर ऑफ फ्रीडम किंवा एस्केप फ्रॉम फ्रीडम या ग्रंथात अतिशय सुंदर विवेचन केले आहे. फॅसिझम इटलीपुरता मर्यादित राहिला नाही. इटलीमध्ये पाय रोवल्यानंतर तो जर्मनी, जपान, स्पेन, पोर्तुगाल, अर्जेटिना आदी देशांत पसरला, जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी पक्षाच्या रूपाने त्याने अत्यंत विकृत व भीषण स्वरूप धारण केले. प्रत्येक देशात फॅसिझमचे स्वरूप तेथील परिस्थित्यनुसार भिन्न होते. कारण त्याला