परिशिष्टे - Page 566

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५२४

जर्मनीमध्ये वंश तत्वावर भर सुस्पष्ट व सुसंगत असे तत्वज्ञान नव्हते. उदा.

हाच सर्व मानवी वंशांमध्ये होता. हिटलरच्या राजकीय तत्त्वज्ञानात आर्यवंश

असा जन्मतः श्रेष्ठ असून तोच मानवजातीवर राज्य करण्यास समर्थ आहे, मूलभूत सिद्धांत गृहीत धरला आहे. तसा सिद्धांत फॅसिझमने मान्य केला नव्हता; परंतु प्राचीन रोमन साम्राज्याप्रमाणे इटलीचे साम्राज्य निर्माण करण्याचे स्वप्न फॅसिझम पाहू लागला.

समाजामध्ये राज्यसंस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था व सर्वकष राज्य आहे, असे फॅसिझम मानतो. समाज ही सावयव एकात्मक वस्तू असून व्यक्‍ती ह्या समाजाचे घटकांश आहेत. शरीराचे अवयव व पेशी हे जसे अंश होत, तसेच व्यक्ती हे अंश होत. अवयव वा पेशी जशा शरीराकरिता असतात, तशा व्यक्ती समाजाकरिता असतात. राष्ट्र वा राज्य हे समाजाचेच विकसित वा उन्नत रूप होय. म्हणून राज्याचे आदेश सर्वांनी बिनतक्रार मानले पाहिजेत. राज्याचे हित ते सर्वांचे हित, व्यक्तीचा विकास राज्याच्या छायाछत्राखालीच होऊ शकतो. राज्याचे संरक्षण व संवर्धन सर्वांनी मिळून केले पाहिजे आणि त्यासाठी झीज सोसण्याची वा आत्मत्याग करण्याची प्रत्येकाची तयारी हवी. राज्य, राष्ट्र आणि समाज यांमध्ये भेद नाही.

राष्ट्राचा नेता हाच राज्याचा आणि समाजाचा नेता असतो. त्याच्या हाती अनियंत्रित सत्ता हवी. राष्ट्राचे हित कशात आहे, हे तोच जानतो. ते हित साधण्यासाठी सर्वांना त्यांच्या कुवती नुसार कामाला लावणे, हा त्याचा अधिकार आहे. तो एक पक्ष निर्माण करतो. एक राष्ट्र, एक नेता व एक पक्ष अशी घोषणा केली जाते.

राष्ट्र एकजीव असते. त्यामध्ये वर्गभेद माजवणे म्हणजे त्याची ताकत खच्ची करण्यासारखे आहे. कामगार, भांडवलदार, शेतकरी व जमीनदार

यांनी एकजुटीने काम करून राष्ट्राची ताकत वाढवली पाहिजे.

राष्ट्र हे वर्धिष्णू असले पाहिजे. त्याने आपले साम्राज्य निर्माण केले पाहिजे. त्यासाठी युद्ध करावे लागते. युद्धाची नेहमी तयारी हवी. युद्धामध्ये पाप नाही, त्यामुळे व्यक्तीचे शौर्य, धैर्य वाढते व त्यांच्या गुणांची कसोटी लागते.

लोकशाही लोकांच्या हिताची नाही. तिने श्रीमंताचे व धंदेवाईक राजकारण्यांचे

फावते व लोकांचे नुकसान होते. सर्वसामान्य लोकांना राष्ट्रहिताचे गहन प्रश्‍न समजत नाहीत, त्यांना त्यामध्ये रस नसतो, म्हणून ते प्रश्‍न जाणत्या लोकांनी

हाताळणे हे उत्तम. या तत्त्वावरून फॅसिझमचा अभिजनवाद (इलिदिझम) उघड होतो; पण फॅसिस्टांना तो दोष आहे, असे वाटत नाही.