परिशिष्टे - Page 567

परिशिष्टे te ote l ह l ५२५

व्यक्तीचे स्वातंत्र्य व व्यक्तीची समानता फॅसिझमला मान्य नाही. -विषमता निसर्गदत्त आहे, ती नाहीशी होणार नाही, काही व्यक्तींमध्ये पुढारीपणाचे गुण असतात, त्यांच्या आज्ञेनुसार काम करणे हेच इतरजनांचे कर्तव्य; त्यातच त्यांचे स्वातंत्र्य आहे व जीवनाची परिपूर्तीही आहे.

इतिहास आर्थिक कारणामुळे घडत नाही. तो घडतो, तो पराक्रमी पुरुषांच्या . पराक्रमामुळे. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार पराक्रम गाजविण्याची संधी देणे यातच समाजाचे हित आहे.

राष्ट्राच्या नेत्याला मदत करण्यासाठी' त्याचे कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी . संघटना हवी. ती संघटना म्हणजे फॅसिस्ट पक्ष, तो पक्ष शिस्तबद्ध व लढाऊ वृत्तीचा हवा व त्याचा नेत्यावर संपूर्ण विश्वास हवा.

ही झाली फॅसिझमची वा नाझीझमची सर्वसाधारण तत्त्वे. त्याच्या तत्त्वज्ञानाचा म्हणजेच विश्वविषयक कल्पनांचा मुद्दामच उल्लेख केलेला नाही, कारण त्या फार गोंधळाच्या व परस्पर विसंगत आहेत. फॅसिझम जडवादी आहे की आदर्शवादी आहे, हे सांगणेही कठीण आहे. त्याच्या कृतीमध्ये खालच्या दर्जाचा जडवाद किंवा भौतिकवाद दृष्टीस पडतो. तर त्याच्या सर्वात महत्वाच्या राज्य या संकल्पनेत आदर्शवाद दृष्टीस पडतो. फॅसिझमला वा नाझीझमला हिंसेचे वावडे नाही, त्यांमध्ये उलट हिंसेचा पुरस्कारच. आढळतो. तसेच नीती- अनितीचाही त्याला विधिनिषेध नाही. राष्ट्रीय उद्दिष्ट साधण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी त्याला चालते. फॅसिझम शांततावादी नसून उलट तो युद्धवादी आहे, तसाच तो उग्र राष्ट्रवादी आहे. उग्र राष्ट्रवाद आणि युद्ध यांचे नेहमी साहचर्य असतेच.

ऐतिहासिक दृष्ट्या फॅसिझम व त्याचे जुळे भावंड नाझीझम जन्माला आले, ते पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर, व्हर्सायच्या तहामुळे जी आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण झाली, तिचा उच्छेद करण्याच्या हेतूने युद्धा जर्मनीचा पराभव झाला होता. त्यामुळे त्याला आपल्या वसाहतींना मुकावे लागले व अॅल्सेस-लॉरेन यांसारख्या काही भागांनाही मुकावे लागले. इटलीचा पराभव झाला नव्हता; पण युद्धानंतर आपले साम्राज्य वाढविण्यासाठी दक्षिण यूरोपमध्ये व उत्तर आफ्रिकेमध्ये आपल्याला काही मुलूख मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नव्हती. म्हणून इटलीही असंतुष्ट होता. आपल्यावर अन्याय झाला आहे अशी दोन्ही देशांची भावना होती. अन्याय दूर करून घेण्यासाठी त्यांना युद्ध हवे होते. म्हणून त्यांनी उग्र राष्ट्रवादाला व युद्धखोर प्रवृत्तींना उत्तेजन दिले. फॅसिस्ट व नाझी पक्षांचा तर तोच कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांना राजाश्रय मिळाला व दोन्ही पक्षांची ताकत व महत्त्व एकदम खूप वाढले.

dui ०४१ ३६