परिशिष्टे ५२७
सत्तासंपादनानंतरची पहिली तीन-चार वर्षे मुसालिनीला सत्ता सुसंघटित व स्थिर बनविण्यात घालवावी लागली. या काळात त्याने सर्व विरोधी पक्ष व विरोधी संस्था नष्ट केल्या आणि देशातील कायदेमंडळ, नोकरशाही, लष्कर, वर्तमानपत्रे, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. म्हणजेच देशामध्ये एक नेता, एक पक्ष व एक आवाज असला पाहिजे, हा जो फँसिझमचा कार्यक्रम, तो त्याने अंमलात आणला. तो अंमलात आणताना त्याने खूप दडपशाही केली. विरोधकांवर अत्त्याचार केले व सर्व लोकशाही हक्क पायदळी तुडविले; पण देशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती. ती त्याने पुनर्प्रस्थापित केली. त्याचेच. पुष्कळांना कौतुक झाले. मुसोलिनीच्या राज्यात गाड्या वेळेवर सुटतात म्हणून अनेकांनी त्याची स्तुती केली; पण त्यासाठी केवढी किंमत मोजावी लागली व पुढे मोजावी लागणार आहे, याचा त्यांना विसर पडला.
त्यानंतर मुसोलिनीचे साम्राज्ययुग सुरू झाले आणि ते देखील फॅसिझमच्या कार्यक्रमानुसार. साम्राज्यवाद फॅसिझमचा अविभाज्य भाग आहे. उग्र राष्ट्रवादाची परिणती नेहमी साम्राज्यवादातच होते. फॅसिझमपुढे उद्दिष्ट होते, ते जुन्या रोमन साम्राज्याचे. त्या काळात इटलीला जी प्रतिष्ठा होती, ती पुन्हा परत मिळवण्याची स्वप्ने फॅसिस्टांना पडत होती. त्यासाठी युद्धे करावी लागतील, हे त्यांना माहित होते. म्हणून त्यांने लष्कर सुसज्ज करण्याकडे खूप लक्ष दिले. लोकांना भाकरी मिळाली नाही तरी 'चालेल; पण लष्कराला युद्ध साहित्य कमी पडता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. इटलीतील जनतेला उद्देशून त्यांनी जे घोषवाक्य तयार केले होते ते असे, “विश्वास ठेवा, आज्ञापालन करा, लढा”. १९३९ साली केलेल्या एका भाषणात मुसोलिनी म्हणाला होता, “अधिक महत्त्वाचे व निश्चित स्वरूपाचे आहे, ते हे की आपण शस्त्रबळ वाढवले पाहिजे,” माझा हुकूम आहे, “तो हा, अधिक बंदुका, अधिक जहाजे व अधिक विमाने मिळवा, कितीही किंमत द्यावी लागली तरी व कोणत्याही मार्गाने त्यासाठी
आपण ज्याला सुसंस्कृत जीवन म्हणतो, त्याला तिलांजली द्यावी लागली तरी
बिघडत नाही.” मुसोलिनीच्या या भाषणात फॅसिझमचे युद्धविषयक धोरण चांगले प्रतिबिंबीत झाले आहे.
फॅसिझमच्या धोरणानुसार इटलीचे साम्राज्य वाढविण्यासाठी मुसोलिनीने १९३५ साली अबिसिनियावर (आताच्या इथिओपियावर) स्वारी करून तो पादाक्रांत केला व नंतर १९३९ साली अल्बेनिया गिळंकृत केला. संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आपण हे केले, असा त्याचा दावा होता. त्याला सुएझचा कालवा