परिशिष्टे - Page 570

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५२८

सत्ता प्रस्थापित करावयाची होती; परंतु तेवढ्यात _ व ईजिप्त यांवरदेखील आपली

त्याला फॅरिझमविरोधी युद्ध असे स्वरूप १९३९ साली दुसरे महायुद्ध पेटले आणि

फॅसिस्ट राजवटींची येऊन त्यामध्ये इटली, जर्मनी व जपान या तिन्ही देशांतील

आहुती पडली. हे युद्ध सुरू झाले ते देखील नाझी-फॅसिस्ट जपानी हुकूमशाहांच्या

साम्राज्यतृष्णा युद्धखोर वृत्तीमुळे व साम्राज्यतृष्णेमुळे. युध्दखोर वृत्ती व फॅसिझममध्ये अंतर्निहित आहेत, तसाच लोकशाहीबद्दलचा तिरस्कार. लोकशाही राष्ट्रे लढतील व इतक्या निकराने लढतील असे त्यांना वाटले नव्हते. त्यामुळे

ते सुलभ विजयाची स्वप्ने पहात होते; पण लोकशाहीने त्यांचा भ्रमनिरास

केला. युद्धातील पराजयामुळे हुकूमशाह तर नष्ट झालेच, पण त्यांनी उभारलेल्या

संघटनाही नष्ट झाल्या. |

दुसऱ्या महायुद्धातील पराभवामुळे फॅसिस्ट राजवटी नष्ट झाल्या; पण फॅसिस्ट

प्रवृत्ती नष्ट झाली असे म्हणता येत नाही. माणसामध्ये अधिकार गाजवण्याची

. हौस असते आणि संधी सापडली की काही माणसे शिरजोर बनतात. त्यांना

अनुकूल संधी म्हणजे इतर मंडळीची अगतिकता. राजकीय आपत्तीमुळे किंवा

आर्थिक संकटामुळे अशी अगतिकता समाजामध्ये काही वेळा पसरते; मग

माणसे आधार शोधू लागतात. एखादा बलदंड मनुष्य त्यांना आधार द्यायला

पुढे येतो. हे लहान प्रमाणावार घडते, त्या वेळी त्या माणसाला दादा किंवा

गुंड म्हणतात. देशव्यापी स्वरूपावर ते घडले म्हणजे तो मनुष्य फॅसिस्ट

हुकूमशाह बनतो. हे संकट टाळण्याचा एकच उपाय आहे; तो म्हणजे माणसांना अगतिक न बनू देणे. त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण करणे व संकटाच्या

काळी त्यांना आधार देतील, अशा त्यांच्या स्वतःच्या संघटना वाढवणे. हे

लोकशाहीचे कार्य ती ज्या प्रमाणात पार पाडील, त्या प्रमाणात फॅसिझमचा

धोका कमी हाईल.

मराठी विश्वकोष : १०, पृ ८२८-८३१,