परिशिष्टे - Page 571

परिशिष्ट-१७
कम्युनिस्ट पक्ष

ऐतिहासिक पार्श्वभूमी : मार्क्स आणि एंगेल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे, क्रांतीच्या मार्गाने कामगारावर्गाची राजकीय सत्ता स्थापन करणे आणि मार्क्सवादी तत्त्वांवरच समाजरचना करण्यासाठी त्या सत्तेचा वापर करणे अशा ध्येयधोरणाने संघटित झालेला गट, कम्युनिस्ट पक्ष या नावाने ओळखला जातो. रशियात १९१७ साली जी राजकीय क्रांती झाली, तिचे नेतृत्व लेनिनकडे होते. तो रशियातील कम्युनिस्ट पक्षाचा आग्रही पुरस्कर्ता आणि एक संस्थापक मानला जातो. त्याने कम्युनिस्ट पक्ष म्हणजे ' कामगारवर्गाचे संघटित अंग्रदल ` असे वर्णन केले आहे. या पक्षाने कामगारवर्गाला संघटित करावे, त्या संघटनेच्या . बळावर समाजातील भांडवलदारवर्ग आणि पक्ष यांच्याकडून [सत्ता ] हस्तगत . करावी, त्यानंतर समाजातील सर्व उत्पादन साधने राज्याच्या मालकीची करावी, व त्यातून शेवटी वर्गविरहित समाजरचनेचे ध्येय साकार [करावे, ] [अशी ] [या ] पक्षाच्या ध्येयघोरणाची रुपरेषा लेनिनने स्पष्ट केली. स्टालिनन आपल्या भाष्याप्रमाणे ते ध्येयघोरण व्यवहारात आणले व रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे _ नेतृत्व संपूर्णपणे आपल्या हाती केंद्रित केले.

रशियात झालेल्या क्रांतीच्या प्रेरणेने जगातील इतर अनेक देशांतही कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले आणि रशियाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपापल्या देशांत राजकीय क्षेत्रात कार्य केले. १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकड्यांप्रमाणे जगातील ८३ देशांमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले असून त्यांची सभासदसंख्या एकूण तीन कोटींच्या जवळपास होती. त्यांपैकी सु. ८५ टक्के सभासदसंख्या रशिया आणि चीन या दोन देशांतील कम्युनिस्ट पक्षांची असून बाकीची १५ टक्के सभासदसंख्या ८१ देशांतील पक्षसदस्यांची आहे

कम्युनिस्ट पक्ष पश्‍चिम यूरोपातील औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशांत वाढेल आणि कामगार-संघटनांच्या साहाय्याने तो त्या देशात क्रांती करील, अशी मार्क्सवाद्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कम्युनिस्ट पक्षाचे बळ प्रामुख्याने अर्धविकसित किवा अविकसित देशांत वाढले. त्यातून पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियात क्रांती झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने सत्ता हस्तगत केली. दुसरे महायुद्ध संपत असतानाच रशियाने पूर्व