परिशिष्टे - Page 572

आणि भाषणे डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन 430

जोरावर सत्तास्थानी यूरोपीय देशांत कम्युनिस्ट पक्षाला आपल्या लष्करी सामर्थ्याच्या

बल्गेरिया, पूर्व जर्मनी बसविले. चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया,

अतिशय या देशांत कम्युनिस्ट पक्षाचे सामर्थ्य दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मर्यादित होते. पण रशियाच्या मदतीने ते पक्ष अधिकारारूढ झाले. पूर्वेकडे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या प्रभावाचे क्षेत्र कोरिया, व्हिएटनाम, इंडोनेशिया, ` खेर प्रजासत्ताक, मलेशिया; ब्रह्मदेश, श्रीलंका आणि काही प्रमाणात भारत या देशांत वाढविले. वरील दोन्ही घटनांचा अर्थ असा होतो को, कम्युनिस्ट पक्ष प्रामुख्याने शेतीप्रधान, औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या अशा अर्धविकसित देशांत संघटित होऊ शकला. आफ्रिका आणि द. अमेरिका या खंडातील काही देशांत कम्युनिस्ट संघटनेची मुळे रुजू पहात आहेत.

कम्युनिस्ट पक्षाचे श्रद्धास्थान : रशियाच्या बाहेरील देशांतील कम्युनिस्ट पक्ष

जवळजवळ १९५० पर्यंत रशियातील कम्युनिस्ट पक्षाच्या आज्ञेनुसार कार्य करीत

होते, ही वस्तुस्थिती तात्त्विक दृष्ट्या कोणी अमान्य केली, तरी व्यवहारात ती नाकारता येण्यासारखी नाही. रशियातील क्रांतीनंतर सतत तीस वर्ष रशियाचेच नेतृत्व जगातील सर्व कम्युनिस्टपक्षांनी अविरोध मान्य केले. पण १९४८ साली यूगोस्लाव्हियाने प्रथम या अद्वितीय नेतृत्वाला आव्हान दिले आणि आपल्या

देशातील कम्युनिस्ट पक्षाचे धोरण स्वतंत्र असावे, असा. आग्रह धरला, त्या नंतर चीनने आपल्या देशाच्या कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्र रीत्या धोरण आखेल असे

जाहीर केले. स्टालिनच्या मृत्यूनंतर हंगेरी, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया यां देशांतील कम्युनिस्ट पक्षाने रशियन नेतृत्वाविरुद्ध अयशस्वी उठाव केले. या सर्व घटनांचा परिणाम, विशेषतः रशिया आणि चीन यांच्या .पैमनस्याचा परिणाम, आशियातील, दक्षिण अमेरिकेतील व आफ्रिकेतील जवळजवळ सर्वच कम्युनिस्ट

पक्षांच्या घोरणावर झालेला दिसून येतो. रशियावादी आणि चिनवादी असे कम्युनिस्ट पक्षांचे दोन गट या देशांत पडलेले दिसून येतात. :

ध्येय आणि धोरण : सर्व कम्युनिस्ट पक्षांचे श्रद्धास्थान मार्क्स व एंगेल्स यांचे ग्रंथ मानले जातात. त्यांत नंतर लेनिन आणि स्टालिन यांनी केलेल्या

मार्क्सवादाच्या स्पष्टीकरणाची भर पडली. स्टालिनच्या मृत्यूनंतर या भाष्यकारांतून

त्याचे नाव वगळण्यात आले. चीन व चीनवादी कम्युनिस्ट पक्ष मोओ-त्से-तुंग

यांचे भाष्य अधिकृत मानतात.

कम्युनिस्ट पक्षांच्या सूत्रांवरून त्या पक्षांच्या उद्दिष्ट फक्त लक्षात येऊ शकेल :

(१) देशातील सर्व उत्पादनसाधने समाजाच्या मालकीची करणे, त्यात उद्योगधंदे आणि शेती यांचाही समावेश आहे. (२) कम्युनिस्ट पक्षाच्या मेतृत्वाने क्रांती