परिशिष्टे - Page 573

परिशिष्टे ५३१

करून सत्ता हस्तगत करणे. (३) सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणे, (४) राज्यक्रांतीनंतर इतर पक्ष आणि संघटना बरखास्त करणे. (प) शिस्तबद्ध आणि कृतिशील अशा पक्षनेतृत्वाकडे समाजाने राजकीय शासन आणि आर्थिक साधने यांची जबाबदारी सोपविणे.

सत्ता हस्तगत करण्यापूर्वी आणि नंतरही काही दिवस कम्युनिस्ट पक्ष देशातील अल्पसंख्य जाती-जमाती, असंतुष्ट वर्ग, धार्मिक अल्पसंख्यांक, वांशिक छोटे गट आणि अत्यंत दरिद्री लोक यांना विकासाची आश्वासने देऊन पक्षाविषयी सहानुभूती आणि आपुलकी निर्माण करतो. पक्षाच्या राजकीय डावपेचाचाच हा एक भाग मानला जातो. त्याबरोबरच धनिक वर्ग, उत्पादनसाघनांचे मालक, अधिकारावर उच्चस्थानी असलेल्या व्यक्ती आणि विरोधी we यांचा, भांडवलादारांचे हस्तक, शोषक, साम्राज्यवादी इ. विशेषणांनी समाजात प्रचार केला जातो. वरील डावपेचाची ही दुसरी बाजू. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याच अनुषंगाने प्रचार करण्यात येतो. कम्युनिस्ट देश शांततावादी आणि कम्युनिष्ठेतर देश युद्धखोर असे समीकरण बनविण्यात येते आणि मग अविकसित राष्ट्रांनी शांततावादी धोरणास, म्हणजेच कम्युनिस्ट देशांच्या धोरणास, पाठिंबा द्यावा असे आवाहन केले जाते. यालाच जागतिक राजकारणाच्या पातळीवरील वर्गसंघर्ष मानण्यात येतो. या प्रचाराचा मागासलेल्या देशांतील कम्युनिस्ट पक्षांवर अधिक प्रभाव पडू लागला, म्हणजे त्याला सक्रिय उत्तेजन देऊन शक्य तर निवडणुकीच्या मार्गाने आणि न जमल्यास लष्करी बळाच्या मार्गाने सत्तेवर आणणे, हेही त्या डावपेचाचे एक अंग होय. त्यासाठी राजकीय धोरणाबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना, साहित्यविषयक चळवळी, कलेच्या क्षेत्रातील प्रयोग इ. विविध साधनांचाही उपयोग करण्यात येतो. सरकारी यंत्रणा आतून पोखरून टाकणे, पोलीस आणि न्यायखाते यांना निष्क्रिय बनविणे आणि जमल्यास लष्करातील तरुण अधिकाऱ्यांवर छाप पाडणे, यांचाही समावेश कम्युनिस्ट पक्षाच्या डावपेचांत करण्यात येतो आणि हे सारे क्रांतीसाठी आवश्यक आणि अपरिहार्य मानल्यामुळे त्यात अयोग्य किंवा वावगे समजले जात नाही.

रशियन कम्युनिस्ट पक्ष : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी औद्योगिक क्षेत्रातील असंतोषातून रशियात मार्क्सवादी चळवळीला आरंभ झाला. प्ल्येखनोंव्ह या क्रोतिकारकाने मार्क्सवादी साहित्य परदेशांतून रशियात गुप्तपणे नेऊन रशियम माषेत त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू केला, आरंभी मार्क्सवादी गटाचे क्षेत्र फार छोटे होते. लेनिन आणि त्याचे सहकारी हेही त्या गटात सामील झाले. १८९० मध्ये रशियात चोवीस लक्ष कामगार होते. आरंभी त्यांची संघटना करणे