आणि भाषणे डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन ५३२.
रशियन डेमोक्रेटिक अत्यंत अवघड होते. १८९८ मध्ये मिन्स्क येथे सोशल
पक्ष अधिकृतरीत्या स्थापन लेबर पार्टीची स्थापना झाली. रशियन कम्युनिस्ट
फाटाफूट झाल्याचे तेव्हापासून मानले जाते. १९०३. मध्ये या पक्षात झाली आणि बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक असे दोन गट त्यातून वेगळे झाले. लेनिन आणि त्याचे सहकारी यांचा बोल्शेव्हिक गट अधिक प्रभावी होता. रशियन क्रांतीच्या वेळी हा गट प्रामुख्याने आघाडीवर होता, मार्च १९१८ मध्ये या
गटाने रशियन कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेव्हिक) अंसे नाव स्विकारले. १९२५ मध्ये ऑल युनियन कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेव्हिक) असे नाव बदलण्यात आले. त्यानंतर १९५२ मध्ये बोल्शेव्हिक हा शाब्द गाळण्यात आला आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ दी सोव्हिएट युनियन असे नाव त्यास देण्यात आले.
पक्षाने घेतलेला निर्णय सर्व सभासदांवर संपूर्णपणे बंधनकारक मानला
जातो. या निर्णयाविरुद्ध चर्चा करणे, जाहीरपणे वा गुप्तपणे त्यासंबंधी बोलणे निषेधार्ह मानले जाते आणि त्याबद्दल सभासद शिक्षेला. पात्र ठरतो. एखाद्या निर्णयाची चर्चा करणे सभासदाला आवश्यक वाटत असेल, तर त्याने तो प्रश्न पक्षाच्या बैठकीत जेव्हा चर्चेला येईल तेव्हाच त्यासंबंधी आपले मत व्यक्त करावे.
त्याविरुद्ध वर्तन करणाऱ्याला शिस्तभंगासाठी' निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा
ठेवलेल्या आहेत. लोकांसमोर अपमानित करणें; सरकारी यंत्रणेतून काढून टाकणे आणि अशाच इतर मार्गानी त्याची पक्षातून हकालपट्टी करणे इ. शिक्षा करतां येतात, संभासदाची पक्षातून हकालपट्टी करण्यापेक्षा पक्षनेत्याला अधिक काही करतां येत नाही. म्हणून स्टालिन आपल्या विरोधकांना नष्ट करण्यासाठी पक्षशिस्तीचे कारण न सांगता त्यांच्यावर राज्य उलथून पाडण्याच्या गुन्ह्यांचा
आरोप ठेवीत असे. अर्थात अशा गुन्ह्याला शिक्षा करणे कायद्याच्या कक्षेत येत असल्यामुळे स्टालिन आपल्या विरोधकांची सजहगत्या वाट :लावू शकत
असे. त्यामुळे पक्षाचे शुद्धीकरण झाले असेही मानण्यात येत असे.
उमेदवारीच्या काळात सभासदाने कोठेही आणि कोणत्याही कामासाठी
जाण्याची तयारी ठेवली पाहिजे; उमेदवाराचे चय किमान १८ वर्षाचे
हवे. रशियाबाहेरही कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व मिळणे असेच काहीसे गुंतागुंतीचे ' असते. पक्षाच्या ध्येयासाठी त्यागपूर्वक कष्ठ करण्याची तयारी, शिस्त आणि
आज्ञापालन या तीन महत्त्वाच्या कसोट्या मानण्यात येतात. पक्षाच्या अगदी
तळाशी असलेल्या प्राथमिक पक्ष केंद्राचा सभासद आपल्या कार्याने वरच्या पक्षसंघटनांत प्रवेश करून आपले कर्तृत्व अधिक व्यापक करू शकतो, अशी
पक्षाच्या नियमांत तरतूद आहे. क्रांतीच्या पूर्वी पक्ष सदस्यांना अत्यंत प्रतिकूल