परिशिष्टे - Page 575

परिशिष्टे 433

परिस्थितीतून जावे लागत असे. क्रांतीनंतर ती परिस्थिती बदलली, पश नवी

' परिस्थितीही सर्व सभासंदाना सारखीच अनुकूल ठरली, असे मात्र म्हणता

येणार नाही.

पक्षाचे सभासद होणे जेवढे अवघड आहे, तेवढेच पक्षातून बाहेर पडणेही अवघड असते. एखाद्या सभासदाने राजीनामा द्यावयाचे ठरविले, तर त्याचा अर्थ त्या सभासदाचा पक्षाच्या ध्येयधोरणाशी, कार्यक्रमाशी किवा पक्षनेत्यांनी केलेल्या आज्ञांशी विरोध आहे, असे मानले जाते आणि मग त्याला आपला विरोध. स्पष्ट करता येत माही. किंवा पक्षातून सरळ राजीनामा देऊन बाहेरही पडता येत नाही. एक प्रकारे त्याच्या मनाचा कोंडमारा होत राहतो. म्हणून पक्षातून राजीनामा दिलेले सभासद सापडत नाहीत. नेतृत्वाच्या विरोधामुळे सभासदांना पक्षातून काढले जाते. सभासदाला मतभेद व्यक्त करणेही अशक्य असते. कारण असा मतभेद म्हणजे पक्षाने ठरविलेल्या कार्यक्रमांशी द्रोह करण्यासारखे मानले जाते. त्यासाठी नेत्यांचा विरोध पतकरावा लागतो.

लोकशाही केंद्रित सत्ता हें पक्षाचे संघटनात्मक मार्गदर्शक तत्त्व मानले जाते. पण प्रत्यक्ष व्यवहारात ही लोकशाही फक्त खालच्या पातळीवरील पक्षसंघटनांच्या सभांत टीका करण्यापर्यंतच मर्यादित असते. पक्षाच्या ध्येयधोरणाचे सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पक्षनेतृत्वावर या मार्गदर्शक तत्त्वाचे आक्रमण होता कामा नये, याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने तरतूद करून ठेवलेली असते.

छ छ ७

मराठी विश्वकोष : ३, पृ ३०९-३०३.