परिशिष्टे - Page 577

परिशिष्टे ५३५

क्रांतीला पोषक असे जे वातावरण निर्माण झाले, त्यामध्ये श्रमजीवी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती हा प्रमुख घटक होता, शासनव्यवस्थेक्रील सरदारवर्गाचे वर्चस्व कमी झाले होते; परंतु आर्थिक व सामाजिक संबंधांत ते टिकून होते. बहुसंख्य शेतकरी वस्तुतः आपल्या जमिनीचे मालक झाले होते; तरीपण परंपरागत सरदारवर्गास अनेक प्रकारचा करभार त्यांस विनाकारण द्यावा लागे. माल विकावयास नेताना रस्ताकर, नदी ओलांडताना पूलकर, पिकांचा तराविक हिस्सा व अंडी इत्यादी सरदारवर्गास हक्काने मिळत. आठवड्यातील तीन दिवस सरदारवर्गाच्या शेतावर राबावे लागे अथवा त्याऐवजी पैसे द्यावे लागत. त्याचप्रमाणे तथाकथित संरक्षणासाठी वार्षिक कर सरदारवर्गास द्यावा लागे, शिवाय शेतकऱ्यास उत्पन्नाचा बारावा किंवा पंधरावा हिस्सा दशांशकर म्हणून चर्चला द्यावा लागे

वरील करांपेक्षा जाचक म्हणजे सरकारकडे भरावे लागणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर होत, यांमध्ये जमीनसारा, डोईकर, प्राप्तिकर, मिठावरील कर इ. मोडत. यांव्यतिरिक्त शेतकऱ्यास रस्त्याच्या कामासाठी वर्षातून कित्येक आठवडे वेठबिगार करावी लागे. वरील सर्व करांपोटी जमीन कसणाऱ्यास उत्पन्नाचा अर्धा भाग तरी पदरात पडत होता की नाही, याची शंकाच आहे.

शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या कामगारवर्गाची स्थितीही शेतकऱ्यांप्रमाणे हलाखीची होती. कमी मजुरी, वाढत्या किंमती, अनिश्‍चित बाजारभाव, बेकारी, उपासमार व रोगराई त्याच्या नशिबी कायमची होती. समाजामध्ये एका टोकास दुर्दैवी श्रमजीवी वर्ग होता; तर दुसऱ्या टोकास चैनीत व विलासात मशगुल झालेला सरदार-पुरोहितांचा वर्ग होता. आर्मा झां रीशल्य (१५८५ १६४२) व्‌ चौदावा लुई यांच्या धोरणामुळे सरदारवर्गास शासनव्यवस्थेमध्ये काहीच स्थान राहिले नव्हते. त्यांच्यातले मातब्बर लोक व्हर्सायला टोलेजंग वाडे बांधून राजाचे अनुकरण करीत आणि चैनीचे आयुष्य घालवीत असत. यामुळे शेतकरी- वर्मापासून ते संपूर्णतः दुरावले [होते. ] |

फ्रान्सची राज्यव्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित पद्धतीची होती. राजा मनास येईल ते कायदे करी व विरोधकांस पकडून बेमुदत तुरुंगात डांबून ठेवी. स्टेटस्‌ जनरलचे (संसदेचे) अधिवेशन १६१४ पासून बोलावलेच गेले नव्हते. न्यायपद्धतीत कमालीचा अनागोंदीपणा होता. कायद्यामध्ये एकवाक्यता, एकसूत्रीपणा व समता यांचा पूर्णतः अभाव होता.

अन्याय, दारिद्र्य व विषमता ही waa फ्रान्सपुरती मर्यादित होती; असे नव्हते;