परिशिष्टे - Page 578

५३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर यूरोपमधील इतर देशांमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या; किंबहुना पोलंड व जर्मनीमधील प्रशिया, बव्हेरिया, सँम्सनी, होल्डनबर्ग, ब्रझविक इ. काही राज्यांमध्ये त्या जास्तच प्रमाणात होत्या; परंतु या परिस्थितीवर मात करून आपण आपले भविष्य उज्वल करू अशी श्रद्धा फ्रेंचांमध्ये जेवढ्या प्रमाणात होती, तेवढी ती अन्यत्र कोठेही नव्हती. ही श्रद्धा वैचारिक क्रांतीच्या पोटी निर्माण झाली होती व ती दृढमूल होण्याचे कारण म्हणजे इंग्लंडमधील वैभवशाली राज्यक्रांतीची (१६८८-८९) स्फूर्ती व अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा (१७७५-८३). या लढ्यात फ्रेंच सैन्याने सक्रिय भाग घेतला होता. नवविचारांचे आंदोलन फ्रान्सप्रमाणे इंग्लंड, जर्मनी व अमेरिका यांतही झाले होते; परंतु फ्रान्समधील विचारवंत जास्त प्रभावी ठरून जनमानसावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. नवविचारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांमध्ये देशासंबंधी विचार केला नसून देशनिरपेक्ष मानवसमाजाच्या कल्याणाचा विचार केलेला आढळतो. सामाजिक, राजकीय व धार्मिक संस्थांचे मुल्यमापन मानवतावादाच्या दृष्टिकोनातून केले गेले. सामाजिक, अर्थव्यवस्थेवर

विशेषतः तत्कालीन धर्मसंस्थांवर या विचारवंतांनी कडाडून हल्ला केला होता. दनी दीट्रो (१७१३-८४), चार्ल्स MARR, (१६८९-१७५५), फ्रान्स्वा व्हॉल्तेअर (१६९४-१७७८), झां झाक रूसो (१७१२-१७७८) इत्यादींचे या संबंधीचे कार्य उल्लेखनीय आहे.

या नवविचारांचे स्वागत मुख्यतः फ्रान्समधील मध्यमवर्गाने व्यापारी, बँकाचे संचालक, दुकानदार, धंदेवाले लोक, वकील, डॉक्टर, अध्यापक यांनी केल. सरदार व पुरोहित यांचे वर्चस्व आणि विशेष हक्क किंवा अधिकार नष्ट करणे, राज्यकारभार सुधारणे, वर्गनिरपेक्षपणे सर्वास राजकीय, आर्थिक व धार्मिक स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे; या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. जनता सार्वभौम आहे, या रूसोच्या तत्त्वाने ते भारले गेले होते; पण वरील गोष्टी साध्य करण्यासाठी फ्रेंच राज्यपद्धतीत सनदशीर मार्ग दिसत नसल्यामुळे क्रांतीच्या अपरिहार्यतेची जाणीव त्यांस होऊ लागली होती

अशा पळी सोळावा लूई (१७७४-८९) गादीवर आला. या पापभीरू व

सत्प्रवृत्त राजाच्या ठायी राज्यकर्त्यास आवश्यक असणारा कणखरपणा, कर्तृत्व व बुद्धिमता नव्हती. सर्व सत्ता त्याची पत्नी राणी मारी आंत्वानेत (१७५५-९३) हिच्या हातात होती. राज्यकारभारावर तिचा प्रभाव जास्त होता. राजा लोकांचे भले करू इच्छित होता; परंतु शासन व राजकारण यांत त्याला विशेष आस्था नव्हती. नाईलाजाने राजाने weed अधिवेशन मे १७८९ मध्ये बोलविले. राज्यकारभारात बदल घडवून आणावयाच्या उत्साहात चर्गदार