परिशिष्टे - Page 579

परिशिष्टे ५३७

निवडणुका झाल्या. मध्यमवर्गीय व शेतकामगार यांचा मिळून जो तिसरा दर्ग बनला होता, त्याच्या प्रतिनिधींनी नेहमीच्या प्रथेप्रमाणे गाऱ्हाणी सादर केली. त्यांचा रोख राज्यकारभारात सुधारणा करणे व समाजातील विषमता नष्ट करणे, यांवर होता; परंतु या गाऱ्हाणी पत्रकात राजाविरुद्ध शब्दसुद्धा काढला नव्हता किंवा क्रांतीची कल्पनाही सुचविली नव्हती, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

यानंतर संसदेच्या मतदानपद्धतीबद्दल बाद उपस्थित झाला. पुरोहित व सरदार यांचे म्हणणे पडले की, परंपरागत पद्धतीप्रमाणे पुरोहित, सरदार a सामान्य किंवा तिसरा गट (थर्ड इस्टेट) या तिन्ही वर्षानी जलग अलग बैठका भरवून मतदान करावे. असे केल्याने पुरोहित व सरदार या दोन वर्गाची मले एका बाजूस व तिसऱ्या गटाचे मत विरुद्ध बाजूस अशी स्थिती होऊन तिसरा वर्ग बहुसंख्य असताही त्याचे मत संसदेमध्ये कधीच प्रभावी ठरू शकणार नाई व त्यास हव्या असणाऱ्या सुधारणा कधीच अंमलात येऊ शकणार नाहीत; हे लक्षात घेऊन तिसऱ्या गटाने अशी मागणी केली की, सर्व वर्गाची एकत्र सभा बोलवावी व मतदान दरडोई एक सत या पद्धतीने घ्यावे. या प्रश्‍नावर राजा निश्चित धोरण लवकर ठरवत नाही, हे पाहून १७ जून १७८९ रोजी तिसऱ्या वर्गाने आपली सभा ही राष्ट्रीय सभा असल्याची घोषणा केली. पुरोहित व सरदार यांस सदर सभेत सामील होण्यासाठी आवाहन केले. शाही बैठकीच्या तयारीचे निमित्त करून राजाचे तिसऱ्या गटाच्या सभागृहस्थानास कुलूप लावून तेथे लष्कर आणून ठेवले. हे याहून ऑनॉरे गाब्रीएल मीराबो (१७४९-९१) व आबे स्येयअस यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्गाचे प्रतिनिधी शेजारच्या टेनिस क्रीडांगणावर गेलें ब तेथे त्यांनी शपथ घेतली की, ' जनतेचे सार्वभौमत्व प्रस्थापित करणारे संविधान तयार केल्याखेरीज आम्ही राष्ट्रीय सभेचे (संसदेचे) प्रतिनिधी एकमेकांपासून दूर होणार नाही '. २० जून १७८९ चा हा शपथविधी म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीची नांदी होती, असे म्हणण्यास हरकत नाही.

संसदेची एकत्र बैठक घेण्यास राजाने अखेर संमती दिली, परंतु त्याचबरोबर सैन्याची जमवाजमव करून दडपशाहीची तयारी ठेवली. याचा परिणाम असा झाला की, पॅरिसची जनता संसदेच्या मदतीस आली व त्यांनी जुलुमशाहीचे प्रतीक असलेला बॅस्तीलचा तुरुंग फोडला (१४ जुलै १७८९). अशा प्रकारे क्रांतीकारकांगी विजयाची पहिली पताका फडकाविली. क्रांतिकाळात राजेशाहीला विरोध करणाऱ्या क्रांतीकारकांनी लाल टोपी ही स्वातंत्याचे [प्रतीक ] [म्हणून ] सर्रास वापरली. तसेच कि फ्रान्सच्या राष्ट्रध्वजात्तील लाल, पांढरा आणि निळा -