परिशिष्टे - Page 580

हा बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५३८

बोधचिऱ्ह म्हणून १७ जुलै १७८९ रोजी असा तिरंगी राष्ट्रध्वज या क्रांतिकाळातच

| वापरण्यात आला.

तात्पुरती मान तुकविली; हिंसक चळवळीचे पर्व : जनतेच्या उठावापुढे लूईने

पण उठाव दडपून टाकण्यासाठी सैनिक बोलविले. हे समजताच पॅरिसच्या जनतेने परत उठाव केला व व्हर्सायच्या राजवाड्यावर ५ ऑक्टोबर १७८९ रोजी स्त्रियांचा मूक मोर्चा नेला. मार्की द लाफायेत (१७५७-१८३४) याच्या प्रसंगावधानामुळे राजकुटुंब त्या दिवसाच्या हत्याकांडामधून बचावले; पण लूईला व्हर्साय सोडून पॅरिसला यावे लागले. पॅरिसच्या तुलरीझ राजवाड्यात तो १० ऑगस्टपर्यंत ओलीस असल्यासारखा राहिला. मूक मोर्चाच्या बातम्या देशभर प्रसृत झाल्या आणि सगळीकडे शासनयंत्रणेविरुद्ध बंडाचे वातावरण फैलावले. ग्रामीण विभागात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी सरदारांच्या वाड्यांवर हल्ले करून त्यांची हक्कपत्रे जाळून टाकली आणि धार्मिक मठांचा विध्वंस केला. लूईचा पळून जाण्याचा प्रयत्म फसल्यानंतर राजाविरुद्ध वातावरण चांगलेच संतप्त झाले. राजसत्ता नष्ट करून प्रजासत्ताक स्थापन करावे, अशी भाषा लोक बोलू लागले.

क्रातिकाळातील राज्यघटना ब सत्तांतरे : सोळाव्या लूइने नाइलाजास्तव बोलविलेल्या संसदेने राष्ट्रीय सभा हे नामाभिधान घेतले. ही सभा म्हणजे फ्रान्सचे एकमुही विधीमंडळ होते. मंत्रिमंडळाची निवड राजा स्वतः करी व त्याचा संसदेशी काही संबंध नसे. राजाच्या तांत्रिक संमतीशिवाय कोणताही प्रस्ताव कायदा म्हणुन अंमलात येऊ शकत नव्हता; परंतु मूलतः कमकुवत मनोवृत्तीचा लुई कठीण परिस्थितीत सापडल्यामुळे संसदेचे प्राबल्य वाढले

होते. बॅस्तीलच्या पाडावातून पॅरिसच्या कम्यूनचे (स्थानिक स्वराज्यसंस्थेचे) महत्त्व वाढत जाऊन संसदेवर कम्यून दबाव आणीत असे. साहजिकच पॅरिस कम्यून मध्ये प्रभावी असलेला गट व व्यक्ती यांचा फ्रान्सच्या राजकारणावर

हळूहळू प्रभाव पडू लागल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय संसदेने १७८९३ तै १७९१ या काळात संविधान तयार केले; महत्त्वाचे

कायदे संमत करून त्यांनी मानवी हक्कांची घोषणाही केली. या घोषणेत स्वातंत्र्य, समता आणि जनतेचे सार्वमौमल्व उद्‌ घोषित करण्यात

आले. क्रांतीनंतरच्या काळात युरोपीय क्रांतिकारकांना ह्या घोषणेपासून स्फूर्ती मिळत गेली. नेपोलियनच्या सर्व सैन्यापेक्षा ही घोषणा जास्त प्रभावी होती,

असे लॉर्ड जॉन अंक्टन (१८३४-१९०२) याने म्हटले आहे. ४ ऑगस्ट १७८४

रोजी संसदेत एका सरदाराने त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सरदारांचे सर्व