परिशिष्टे - Page 582

डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४०

तर आपल्याला युरोप पर्वकालों भरलेली दुसरी सभा आपण शोधू लागलों

खडादील फ्रान्स देशाच्या इतिहासांत शिरावे लागेल. १३८ वर्षापूर्वी फ्रॉन्स

१७८९ दिवशी एक देशांतील सोळाव्या लुई राजाने तारीख २४ जानेवारी सन या आज्ञापत्र काढून आपल्या राज्यांतील प्रजेच्या प्रतिनिधींची अशीच एक सभा बोलाविली होती. या फ्रेंच राष्ट्रीय सभेच्या नांवानें कांहीं इतिहासकार खडे फोडतात. या सभेने फ्रान्स देशाच्या राजाराणीस सुळी दिलें; वरिष्ठ वर्गास सळो का wid करून त्यांची कत्तल केली व उरले त्यांना देशोधडीस लाविलें. श्रीमंतांची मालमत्ता जप्त केली व १५ वर्षाहून अधिक साऱ्या युरोपखंडांत यादवी माजवून ठेवली. असा त्यांचा या फ्रेंच राष्ट्रीय समेवर आरोप आहे. माइयामलें हा ठपका अस्थानी आहे, इतकेंच नव्हे तर अशा इतिहासकारांना या फ्रेंच राष्ट्रीय सभेंनें जी कागगिरी केली तिचे खरें इंगीत कळलें नाहीं असेंच म्हणावें लागतें. या सभेच्या कामगिरीमुळे फ्रान्स देशाचेच कल्याण झालें आहे असें नव्हे, तर साऱ्या पुरोपखंडाचें कल्याण झालें आहे. आज युरोपियन राष्ट्र सुख व समृद्धी भोगीत असतील त्याला कारण एकच. व ते हे कीं या १७८९

साली भरलेल्या क्रांतिकारक फ्रेंच राष्ट्रीय सभेने समाजसंघटमेचीं जीं तत्वें विस्कळीत व निर्माल्यवत झालेल्या तदकालीन फ्रेंच राष्ट्रापुढे मांडली व त्यावर तीं जबरीनें लादली तींच तत्वे युरोपखंडानं मान्य केली व आवारांत आणली,

या फ्रेंच राष्ट्रीय सभेचे महत्व व तिच्या तत्वांची महती कळण्याकरितां त्या काळाची फ्रेंच समाजाची परिस्थिती ध्यानांत घेतली पाहिजे. आपला हा हिँदु समाज वर्णाश्रम धर्मावर रचण्यांत आला आहे हें आपणा सर्वास विदित

आहेच. तशाच प्रकारची वर्णाअमव्यवस्था फ्रान्स देशामध्येंही सन १७८९ सालीं होती. फरक इतकाच कीं, फ्रेंच समाज हा त्रैवर्णीकांचा होता. हिंदुसमाजाप्रमाणे फ्रेंच समाजांतही ब्राह्मण वर्ण होता, व क्षत्रिय वर्णही होता. मात्र फ्रेंच समाजामध्ये वैश्य, शूद्र व अतिशूद्र असे तीन निरनिराळे वर्ण न करितां तिघांचा मिळून एकच तृतीय वर्ण करण्यांत आला होता. हा फरक अगदीं गौण आहे. महत्त्वाची गोष्ट ही कीं, हिंदु समाज व फ्रेंच समाज या उभय समाजांत वणश्रिमव्यवस्था

सारखीच होती. वर्णव्यवस्थेमुळे उभयतांत उत्पन्न होणारी भिन्नता एवढेंच काय

तें साम्यतेच्या दृष्टीनें ध्यानांत घेण्यासारखें आहे असें नाहीं. तर वर्णव्यवस्थेंतील

असमानताही फ्रेंच समाजांत होती. फ्रान्स देशांत या असंमानतेचे स्वरूप

निराळ्या प्रकारचें होतें तेथ परस्पर वर्णातील असमानता आर्थिक स्वरूपाची होती पण ती तितक्याच तीव्र प्रकारची होती, एकूण लक्षांत ठेवण्यासारखी

गोष्ट ही कीं,