परिशिष्टे ५४१
आजच्या या आपल्या समेंत व फ्रान्समधील करसाय मुक्कार्मी ता. ५ मे सन १७८९ रोजी भरलेल्या फ्रेंच लोकांच्या क्रांतीकारक राष्ट्रीय सभेत अत्यंत मोठें साम्य आहे.
त्यांच्या परस्परांतील. परिस्थितींत साम्य दिसतें इतकेच नव्हें तर त्यांच्या ध्येयातही पुष्कळसें साम्य आहे. फ्रेंच लोकांची ती सभा फ्रेंच समाजाची संघटना करण्यास्तव बोलविण्यांत आली होती. आजची ही सभा हिंदु समाजाचें संघटन करण्यासाठी बोलविण्यांत आलेली आहे. अर्थात ही संघटणा कोणत्या तत्वावर करण्यांत यावी याची चर्चा करण्यापूर्वी या फ्रेंच लोकांच्या सभेने फ्रान्स देशाची संघटणाकरण्याकरितां कोणते धोरण स्विकारिलें व कोणत्या तत्वांचा आधार घेतला याची बूज आपण सर्वांनी करून घेतली पाहिजे, या फ्रेंच सभेचा व्याप आपल्या आजच्या सभेच्या व्यापापेक्षां पुष्कळच विस्तृत असा होता. फ्रेंच लोकांच्या या सभेस राजकीय, सामाजिक व धार्मिक असें त्रिविध प्रकारचें संघटन करावयाचें होतें. आपल्याला फक्त सामाजिक व॑ धार्मिक संघटना कशी होईल याचाच विचार करणें अवश्य आहे. आपणांस राजकीय संघटणांशी तूर्त कर्तव्य नसल्यामुळें धार्मिक व सामाजिक संघटणेचे बाबतींत या फ्रेंच सभेनें काय केलें एवढेंच काय तें आपणांस पहावयाचें आहे. या फ्रेंच सभेने सामाजिक व धार्मिक संघटणेचे बाबतींत जें धोरण ठेविलें होतें तें धोरण कोणत्या प्रकारचें होतें हें या सभेनें जें तीन महत्त्वाचे जाहीरनामे काढले त्यावरून कोणासही
उघड दिसून येणार आहे. पहिला जाहीरनामा ता. १७ जून १७८९ रोजीं
काढण्यांत आला. तो जाहीरनामा फ्रान्स देशांतील वर्णाश्रम धर्षासंबंधाने होता. पूर्वी सांगितल्याप्रमाणें फ्रेंच संमाज त्रैवणिक होता, या जाहीरनाम्यानें हा त्रैवर्णिक समाज मोडून साऱ्या समाजाचा एकवर्ण करण्यांत आला. इतकेंच नव्हे तर राजकीय सभागृहांत या त्रैवार्णिकांसाठी ज्या निरनिराळ्या जागा राखण्यांत आल्या होत्या, त्या खालसा करण्यांत आल्या. दुसरा जाहीरनामा धर्मोपदेशकासंबंधानें होता. पुरातन रूढीप्रमाणें हे धर्मोपदेशक नेमणे किंवा काढणे हें राष्ट्राच्या स्वाधीन नसून, पोपसारख्या परदेशीय धर्माधिकाऱ्याची मिरास होऊन बसली होती. ज्यांस धर्मोपदेशक पोप नेमील तो धर्मोपदेशक होत असे; मग, ज्यांना हा धर्मोपदेशक धर्माचा उपदेश करणार त्यांच्या दृष्टीनें तो त्या अधिकारास लायक असो किंवा नसो ! या जाहिरनाम्यानें धर्माधिकारी वर्गाचे स्वयंभूपण नाहींसें करण्यांत आलें व हा पेशा कोणी करावा, त्याला लायक कोण व नालायक कोण, त्याला वेतन द्यावयाचें किंवा न द्यावयाचें, वगैरे गोष्टी ठरविण्याचा अधिकार फ्रेंच राष्ट्राला देण्यांत आला. तिसरा जाहीरनामा राजकीय,
ति सिल
ART ६४१-३७