डॉ, बाबासाहेड आंबेडकर लेखन आणि भाष्णे ५४२
असून हरएक नव्हता. तो सर्वसाधारण आर्थिक अथवा धार्मिक व्यवस्थेसंबंधी
पायावर उभारली जावी, प्रकारची सामाजिक व्यवस्था, कोणत्या तत्त्वाच्या
अत्यत यासंबंधाचा होता. त्यादृष्टीने हा जाहीरनामा या तीनही जाहीरनाम्यात महत्त्वाचा असा जाहीरनामा आहे. किंबहुना त्यास या सर्व जाहीरनाम्यांचा राजा आहे, असे म्हटलें तरी चालेल. हा जाहीरनामा जन्मसिद्ध मानवी हक्कांचा जाहीरनामा यानांवानें सर्व जगती तलावर सुप्रसिद्ध होऊन राहिला आहे. तो जाहिरनामा नुसत्या फ्रान्स देशाच्या इतिहासांतील एक अपुर्व अशी चीज आहे; इतकेंच नव्हे तर साऱया सुधारलेल्या राष्ट्रांच्या इतिहासांत तो अपूर्व होऊन राहिला आहें, कारण या सभेचे अनुकरण करून युरोपांतील दरेक राष्ट्राने आपल्या राज्यव्यवस्थेंल त्याला अधिष्ठान दिलें आहे. यास्तव त्यानें नुसत्या फ्रान्स देशांतच क्रान्ति केली नाहीं, तर सर्व जगांत क्रान्ति केली, असें म्हणण्यास मुळींच हरकत नाही. या जाहीरनाम्याची एकंदर १७ कलमें आहेत. त्यांपैकीं
खालील कलमे महत्वाची आहेत.
(१) सर्व माणसें जन्मतः समान दर्जाची आहेत; व तीं मरेपर्यंत समान दर्जाचींच राहतील. लोकहिताकारणेंच त्यांच्या दर्जात अंतर करतां येईल. येरवी, त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे.
(३) अखिल प्रजा ही सर्वाधिकासची मायधूमि आहे. कोणत्याही व्यक्तीचे, समुदायाचे अगर वर्गाचे विशिष्ट हक्क जर ते प्रजेनें दिले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर-मग तो आधार राजकारणाचा असो, धर्मकारणाचा
असो -मान्य केले जाणार नाहीं. |
(४) कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्काप्रमाणें वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर जर मर्यादा घालण्यांत आली तर ती दुसऱ्या व्यक्तीला
तिचा जन्मसिद्ध हक्क उपभोगण्यास अवसर मिळावा, इतक्यापुरतीच घालतां येईल. व ती मर्यादा कायद्यानें ठरविली जाईल. ती धर्मशास्त्राच्या आधारांने
किवा इतर कशाच्याही आधाराने ठरविली जाणार नाहीं.
(५) जेवळ्या गोष्टी समाजास विघातक होतील तेवढ्याच गोष्टी करण्याची
कायद्यानें बंदी केली जाईल. जी गोष्ट कायद्यानें मना केली नसेल ती
करण्यास सर्वांना मुभा असावी. तसेंच जी गोष्ट करणे कायद्यानें अवश्य
ठरविली नसेल ती गोष्ट करावयास कोणासही भाग पाडले जाऊं नये.