परिशिष्टे ५४३
(६) कायदा म्हणजे अमूक एका वर्गाने ठरविलेली बंधने नव्हे. तो कोणत्या प्रकारचा अंसावा, हैं ठरविण्याचा हक्क सर्व प्रजेस अगर तिच्या प्रतिनिधीस आहे. हा कायदा संरक्षक असो अगर शासनात्मक असो, तो सर्वास सारखाच असला पाहिजे. आणि सर्वाची समानता या तत्वाच्या आधारावरच सर्व प्रकारची व्यवस्था उभारणें न्याय असल्यामुळें सर्व व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या मानसन्मानास, अधिकारास, व्यवसायास सारखीच पात्र आहेत. या बाबतीत जर काहीं भेदाभेद झाला तर तो केवळ व्यर्क्तीतल्या गुणभेदामुळेंच होऊ शकेल. जन्मामुळे होऊं शकणार नाहीं,
आजच्या या आपल्या सभेनें या फ्रेंच राष्ट्रीय सभेची प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे ठेविली पाहिजे, असें मला वाटतें. तिनें जो मार्ग फ्रेंच राष्ट्राच्या संवर्धनासाठी आंखून ठेवला व जो मार्ग सर्व सुधारलेल्या राष्ट्रांनी मान्य केला, तोच मार्ग हिंदुसमाजाच्या संवर्धनासाठीं या सभेनें आंखला पाहिजे व बेटीबंदीपासूः भेटीबंदीपर्यंत वर्णाश्रमाच्या चौकटीचे हे खिळे उडवून हिंदुसमाजाचा एक वर्ण केला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यता जाणार नाहीं व समताहि प्रस्थापित होणार नाहीं.”
या क्रांतीपुर्वी खालीलप्रमाणे फ्रान्समध्ये वर्ग व्यवस्था होती,
१ ला वर्ग-खिश्चन पादरी, बिशप व आर्च बिशप - यांचे जीवन ऐश्वर्यशाही,
स्वरुपाचे असून ते स्वतःला इतर पादरी वगपिक्षा उच्च समजणारे.
२ रा वर्ग-- सुप्रतिष्ठित, श्रींमतःचा वर्ग, गरीबाविषयी विषमता, द्वेष इत्यादी
बाळगणारे. |
३ रा वर्ग-- गरीब, शेतकरी, कामगार, मजूर व इतर सामान्य, अत्यंत
गरीब, लहान-लहान घरात राहणारे, दुःखी, कोंणालाही जेलमध्ये
त्याची बाजू ऐकून न घेता कित्येक दिवस ठेवणे, तसेच
एका स्वरुपाच्या गुन्ह्याकरिता वर्गानुसार वेगवेगळी शिक्षा
ठोठावणे.
या क्रांतीची महुर्तमेढ रोवण्यात बुद्धिवादी व. तत्त्वज्ञानी लोकांनी सामान्य लोकात चेतना निर्माण करण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली होती. त्यात प्रामुख्याने मॉन्टेस्क्यू (१६८९-१७५५); वाल्टेर (१६९४-१७७८) आणि रुसो
१ : बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८.