डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४४
मानवतावादी (१७१२-१७७८) यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी प्रखरपणे
आधारित धर्मव्यवस्थेवर आघात, भूमिका घेऊन विषमतेचा घिःकार, विषमतेवर
आणि व्यवस्थेचे नग्न स्वरुप रूढी, परंपरा व अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले वर्ग
लोकांच्या नजरेस आणले. रुसोने याचबरोबर मनुष्य हा स्वाभाविकपणे सदाचारी, सरळ, स्वतंत्र, इमानदार, समानतावादी असतो परंतु सर्व जागी शुंखलेने बांधला गेला या दृष्टिकोनातून सामाजिक धार्मिक प्रबोधन केले.
ता. ५ ऑक्टोबर १७८९ रोजी स्त्रियांनी हातात काठ्या व गदा घेऊन पेरिस ते वर्साइल पर्यंत, रोटी-रोटी-रोटी चे नारे देत मोर्चा काढून ता. ६ ऑक्टोबर १७८९ रोजी राजमहालावर आक्रमण केले आणि यामुळे राजा, राणी, मुले पॅरिसला पळाले. aa ॒
या क्रांतीचे नेतृत्व दुसऱ्या वर्गाच्या हातात होते. त्यात प्रथम श्रेणीचे बिशप व आर्च बिशप सोडून सर्व पादरी आणि तिसन्या वर्णाचे सर्व लोक याचा सहभाग
होता.
क्रांतीचे परिणाम व महत्त्व : स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व ही तस्वत्रयी वरील क्रांतिकारक सुधारणांची प्रेरणा होती. त्यांच्या जोडीला क्रांतीने जनतेच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली होती. ही तत्त्वत्रयी क्रांतीच्या काळात सार्वजनिक इमारतींवर झळकत असे, नेपोलियनने हुकूमशाही प्रस्थापित केल्यावरही ती शब्दावली न पुसता तशीच ठेवण्यात आली. स्वातंत्र्यामध्ये भाषण, लेखन, प्रकाशन तसेच धार्मिक आणि खाजगी मालमत्तेचे स्वातंत्र्य ह्या गोष्टी अभिप्रेत होत्या. समतेमध्ये सरदारवर्माची व तिच्यामधील खास अधिकारांची समाप्ती, सर्व नागरिकांस वर्गनिरपेक्ष समान संधी व कायद्याच्या बाबतीत समानता या गोष्टी अंतर्भूत होत्या. विश्वबंधुत्व म्हणजे जगामध्ये स्वातंत्र्य व समता यांवर विश्वास असणारे व ती तत्त्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशांतील असोत; ते एकमेकांचे बंधू आहेत. स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व आणि जनतेचे सार्वभौमत्व या कल्पनांचा प्रसार सशस्त्र क्रांतीपूर्वी वैचारिक क्रांती करणाऱ्या फ्रेंच तत्त्ववेत्त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला
होता. क्रांतीने या कल्पना साकार करण्याचा रांगडा, धसमुसळेपणाचा प्रयत्न
केला. क्रांतीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, ते यूरोपीय जनतेमुळे नव्हे; तर फ्रेंच सैन्यामुळे ! फ्रान्सबाहेर क्रांती मानली न जाता लादली गेली होती. तत्त्वापेक्षा परिस्थितीच्या गरजेचा प्रभाव त्यांच्या कृतीवर जास्त पडला होता. सामाजिक संमतेवर अशा प्रकारच्या लोकशाहीची व सामाजिक न्यायाची