परिशिष्टे - Page 587

परिशिष्टे . ` ५४५

क्रल्पना यूरोपीय विचारांमध्ये. कायमची दृढमूल झाली. पुढील इतिहासावरून ही कल्पना मूर्त स्वरुपात आणण्याचे प्रयत्न यूरोपात व अन्यत्र झालेले दिसून येतात आणि आधुनिक युगातही ते पुढे चालू आहेत. तसेच या काळात गरजेच्या पोटी किंमतीवर नियंत्रण आणणे, खाजगी मालमत्ता ताब्यात घेणे, यांसारख्या ज्या काही गोष्टी क्रांतिकालीन शासनांना कराव्या लागल्या; त्यांमधून काही विचारवंतांना समष्टिवादाची प्रेरणा मिळाली. क्रांतिकारकांचे बंधुत्त्वं व आंतरराष्ट्रीय एकात्मता जगाच्या निदर्शनास आणण्यासाठी फ्रेंच नेता लाफायत याने बस्तीलच्या किल्ल्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिग्टन यास देण्यासाठी इंग्लिस क्रांतिकारक टॉमस पेन याच्या हवाली केल्या. टॉमस पेन व जेरेमी बेंथॅम यांस फ्रान्सने नागरिकत्त्वाचे हक्क दिले. क्रांतीची तत्त्वे व वरील घटना यांचा विचार करता फ्रेंच राज्यक्रांतीची बैठक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती, हे लक्षात येते. दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे फ्रान्समध्ये व फ्रेंचाच्या ताब्यातील इतर देशांत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली; राष्ट्रवादास प्रोत्साहन मिळाले आणि विसाव्या शतकातील राजकीय जागृतीवरही तिचा परिणाम झाला. क्रांतीकारक फौजांनी परक्या राजघराण्यास हाकलून लावले खरे पण क्रांतीचा प्रसार करण्यास निघालेल्या फ्रेंच फौजांमध्ये उत्तरोत्तर स्वार्थी व आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद संचारला व त्याची प्रतिक्रिया म्हणून विरोधक देशांतील लोकांमध्ये स्वत्वाची म्हणजेच राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. विशेषतः पुढे नेपोलियनच्या काळात ही भावना प्रखर झालेली आढळते. फ्रेंच राष्ट्राच्या यशासाठी व नेपोलियनच्या इभ्रतीसाठी आपणास कारभार सहन करावा लागावा, हे स्पेन, हॉलंड, ऑस्ट्रिया यांसारख्या देशांतील लोकांस मानहानीचे वाटू लागले. अन्यायाच्या व अपमानाच्या जाणिवेतून राष्ट्रीय भावनेने उसळी घेतली. शासन स्थापणे हे नवे ध्येय निर्माण झाले. यूरोपातील जुनी सामाजिक व राजकीय घडी विस्कटल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इटली व जर्मनी यांची एकीकरणाची चळवळ सुरू होण्यास क्रांतीने गती मिळाली. अशा प्रकारे अभावितपणे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे यूरोपातील राष्ट्रवादास स्फुर्ती मिळाली व एकोणिसाव्या शतकात या राष्ट्रवादी चळवळी फोफावल्या

फ्रेंच क्रांतीचे मूल्यमापन आधुनिक विचारवंत अनेक प्रकारे करतात; परंतु क्रांतीच्या उद्दिष्टांपेक्षा तिची परंपरा व्यापक आहे. तीमध्ये क्रांतिकारी प्रक्रियेची अधिमान्यता, क्रांतीच्या मार्गाने मोठे उद्देश गाठण्याची शक्यता, क्रांतीमर्भ प्रचार आणि कृती ही अधिमान्य राजकीय साधने व आशय आहेत. क्रांतीने राजकीय कृतीचा धडा यूरोपीय जनतेला दिला. या सामूहिक अनुभवातून क्रांतीची