नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 59

१७ नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य

दिल्या नाहींत. अस्पृश्यांना त्यांनी त्या कोणालाच दिल्या नाहींत याचें कारण

दिल्या नाहीत. सिलोन कमिशनसारखा दिल्या नाहींत तशा मुसलमानांनाहीं

दाखविला असतां व अस्पृश्यांना वागविले तसें निःपक्षपातीपणा नेहरू कमिटीने

राखीव कमिटीने न दिल्याचा मुसलमानांना वागविलें तर अस्पृश्यांना जागा आम्ही

विषाद मानला नसतां. अस्पृश्यांना कांहीं प्रमाणांत राखीव जागा मिळाल्याने त्यांच्या हाती मोक्ष येईल असें मानण्याइतके दुधखुळे कोणी नाहीत. राखीव जागांची संख्या कितीही वाढली तरी कायदेकौन्सिलांत अल्पसंख्यांक लोक

अल्पसंख्याकच राहणार आहेत. बहुसंख्याक लोकांच्या जुलमापासून अल्पसंख्यांकांची सुटका होण्यास राखोव जागेची मात्रा केव्हांही झाली तरी अपुरीच

पडणार आहे. जुलमी बहुसंख्यांकाविरुद्ध बंड करून आपला तरी प्राण देणें

किंवा त्यांचा प्राग घेणें हाथ अल्पसंख्यांकाच्या हाती अखेरचा उपाय आहे याची पूर्ण जाणीव आम्हास असल्यामुळे राखीव जागेच्या सवलतीवर आमची विशेष भिस्त नाही. पण आमचा मुद्दा असा आहे कीं, नेहरू कमिटीने केलेली मतदार-संघाची योजना निःपक्षपाताची नाहीं. हिंदु समाजाच्या उतरंडीला धक्का न लावतां

वरच्यांना वरती व खालच्यांना खालीं ठेवून स्वराज्यसत्ता संपादन करण्याचा हा ब्राह्मणी कावा आहे असें आमचें स्पष्ट मत आहे. नाहीं तर ज्या सवलती मुसलमानांना देण्यांत आल्या त्या सवलती मागासलेल्या हिंदूंना किंवा अस्पृश्यांना देण्यांत आल्या नसत्या काय ? त्यान देण्याचे कारण नेहरू कमिटी कोणतेहि देवो. आम्हाला दिसत असलेले कारण अगदीं निराळे आहे. मुसलमान व ब्राह्मणेतर दोघेहि मागासलेले आहेत. पण ब्राह्मण्य संरक्षणाच्या दृष्टीनें त्या

दोहोंत एक मोठा फरक आहे. तो हा कीं मुसलमानांना राजकीय बाबतींत

सदलती दिल्याने देश बुडाला तर बुडेल पण ब्राह्मण्य बुडू शकत नाहीं. त्याच

ड्राह्मणेतरांना दिल्याने देश बुडणार नाहीं पण ब्राह्मण्याचा नार होईल हें

खास. ब्राह्मणांचे धार्मिक वर्चस्व जें आजवर टिकून राहिलें आहे, याचे मुख्य

कारण म्हणजे ब्राह्मणेतरांच्या हातची राजकीय सत्ता धार्मिक सत्ता हातीं असलेल्या

ब्राह्मणांकडे गेली हें होय. राजकीय सत्तेची जोड मिळाल्यामुळेंच त्यांची धार्मिक wat टिकून राहिली आहे. राजकीय सत्तेचा आधार तुटल्याबरोबर सामाजिक

व धार्मिक सत्तेचा पाया ढासळून पडणार आहे. जेथे धार्मिक सत्तेला राजकीय

सत्तेची जोड मिळाली तेथें ब्राह्मण वर्ग पाणक्या किंवा स्वयपाकी होऊन राहिला

आहे व जेथें धार्मिक सत्तेला राजकीय सत्तेची जोड मिळाली तेथें ब्राह्मण राज्यावर

बसले आहेत. याची साक्ष पेशवाई देत आहे. ज्या दिवशी ही जोडी फुटेल

आणि ब्राह्मणांच्या हातची राजकीय सत्ता ब्राह्मणेतरांच्या हाती जाईल त्या दिवर्शी

हा ब्राह्मण्याचा घडा भरणार आहे. मागासलेल्या हिंदूंना अगर अस्पृश्याना