परिशिष्टे - Page 590

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५४८

सिद्धांताचा तो एक जो लायक तोच जीवनकलहात टिकेल, या डार्विनच्या

जे हा प्राचीन असल्यामुळे प्रकारे पुरस्कार करीत असे. संघर्ष जीवनाइतकाच

निसर्गाचाच क्रम आहे. प्रबळ तेच टिकतील आणि दुर्बळ ते नाश पावलील, हा मनुष्य हा मानवतेच्या तत्त्वानुसार प्राणिजगात श्रेष्ठ होत नाही, तर अत्यंत पाशवी लढ्यानेच तो स्वतःला जिवंत ठेवू शकतो, हा त्याच्या नाझीवादाचा विचार होता. त्याला सिलेक्शन ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जे लायक तेच जगण्यासाठी निवडले जातात, असे सूत्ररूप त्याने दिले.

वंशश्रेष्ठत्वाच्या, असमानतेच्या, अन्य वंशीयांना दुय्यम दर्जाचे मानव समजण्याच्या नाझी विचारप्रणालीत त्याचा ज्यू-द्वेष हा विशेष भाग होता. ज्यू हे सैतान आहेत. श्रेष्ठ वंशीय जर्मनांचा पुरुषार्थ खच्ची करण्यासाठी त्यानी निरनिराळ्या प्रकारची कारस्थाने रचली. ख्रिस्ती धर्म हेही असेच एक कारस्थान होते. मार्क्सवादी बोल्शेव्हिझम हेही नाझींच्या मते ज्यूंचे कारस्थान होते. कम्युनिझमपासून वेश्याव्यवसायापर्यत सर्व भ्रष्ट व अधःपाताचे मूळ ज्यू लोकच आहेत, अशी एक पिसाट श्रद्धा नाझीवादाच्या प्रणेत्यांची होती. यातूनच

ज्यूंच्या शिरकाणाची भीषण कृत्ये निर्माण झाली. नाझींची बंधनागारे व संहारकेंद्रे हा या मानवताविरोधी व ज्यू-द्वेष्ट्या विचारसरणीचाच परिपाक होता. ही बंधनागारे माणसांची केवळ हत्या करण्यासाठी नव्हती. माणसांची नुसती paaa करावयाची असती, तर या छावण्यांची जरूर नव्हती; पण नाझींना नुसती कत्तल करावयाची नव्हती. अमानुष शारीरिक छळ व विटंबना करून

माणसाची माणुसकी नष्ट करावयाची होती. त्याचा मानवी आत्मा, त्याची

आत्मप्रतिष्ठा प्रथम संपुर्ण नष्ट केल्यानंतरच गॅसच्या मोठ्या. शेगड्यांत टाकून

त्यांची अक्षरशः राख करण्यात आली. म्हणजे ज्या भानवी मुल्यांचा नाझीवाद तिरस्कार करीत होता, ती मूल्ये त्यांनी भस्मसात केली. हा नाझीवादातील

नाशवादाचा भीषण आविष्कार होता. |

नाझीवादाने व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य झिडकारले, तसाच लोकशाही शासनपद्धतीचा

अव्हेर केला. हिटलरला १९३३ मध्ये सर्वाधिकार मिळताच त्याने कायदा

करून नाझी पक्ष हाच जर्मनीचा एकमेव राजकीय पक्ष म्हणून जाहीर केले. दुसरा

कोणताही राजकीय पक्ष अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करणे हा राजद्रोह

ठरविण्यात आला आणि पक्षातही अन्य प्रतिस्पर्धी नेता असणे हिटलरला मान्य

नव्हते. त्याच्या नाझीवादात नेतृत्त्वाच्या या तत्त्वाला असाधारण महत्त्व

होते. कारण एक जरी विरोधी वा बंडखोर पुढारी निर्माण झाला, तरी

सर्वाधिकारशाहीचा सर्व डोलारा कोसळून पडण्याची भीती होती. म्हणून पक्ष