डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५५६
बाबासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी सन १९२४ सालापासून ते तहत मृत्यूपर्यंत ते
होऊन स्वदेशी आल्यानंतर कै. मडके होते. १९२४ साली बाबासाहेब बॅरिस्टर
घेतली होती. महाड-सत्याग्रह, नाशिक- बुवांनी बाबासाहेबांच्या अभिनंदनपर सभा
सत्याग्रह, व महार परिषद यामध्यें कै. मडकेबुवानीं बजावलेली कामगिरी प्रामुख्याची
होती.
महाड येथील सत्याग्रहाच्या वेळचा एक प्रसंग, मडकेबुवांच्या आठवणीच्या दृष्टीने तो फारच चिरस्मरणीय आहे. महाड येथें, हिंदुंचा दुष्ट धर्मग्रंथ- मनुस्मृती-जाहीरपणें जाळण्याचा संकल्प बाबासाहेबांनी जाहीर केला होता. तो मनुस्मृत्ति-दहनाचा विधीही पण शास्त्रोक्त करावयाचा होता. अस्पृश्यांची, निष्ठावंत भीमसेना आत्मियतेने तसेंच जागरुकपणें हा मंगल विधी पहाण्यास व त्याचें परिणाम भोगण्यास ठाकली होती. ज्याप्रमाणें एकाद्या देवीपुढें बकरे द्यावयाचें असले म्हणजे, त्यास शेंदूर लावला जातो; लिंब गळ्यांत बांधला जातो; नि मग वाजत गाजत, त्याचें बलिदान करावयाचे असतें, त्याचप्रमाणें सर्व कांहीं संस्कार मनुस्मृतिस ज्वालामध्यें बळी देतांना करावयाचे होते. या अभूतपूर्व समयासाठी कांहीं बुवांची नेमणूक करण्यांत आली होती. या बुवांनी अग्नि देवतेस जागृत करण्यासाठी श्लोक म्हणावयाचे; नि नंतर विधिपूर्वक मनुस्मृतीचा होम करावयाचा होता. या बुवांच्यापैंकी मडके बुवा एक होते; नव्हे ते तर म्होरकेच होते. त्यांनी श्र्लोक म्हटले; नि पृष्ठा पृष्ठांनी मनुस्मृतींस अग्निकुंडांत गडप करून टाकले. असे मनुस्मृतीचे अंत्य संस्कार, बुवांनी बाबासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी म्हणून केले. एकनिष्ठेंत त्यांना कशाचीच डर नव्हती.
डॉ. बाबासाहेबांच्या सुरक्षतेबद्दल त्यांना केवढी तरी चिता वाटत असे.
डॉ. बाबासाहेबांच्या जीवावर जे कांही बाके प्रसंग गुदरले, त्या त्या वेळी, बुवांनी
स्वतःचे प्राण धोक्यांत गेले तरी बेहत्तर या भावनेनें ते बाबासाहेबांचे संरक्षक म्हणून राहिले, असे दोन प्रसंग नमूद करण्यासारखें आहेत.
पहिला प्रसंग, रायगडावरील आहे. डॉ साहेब महाडची सभा आटोपून रायगडी चालले होते. शौर्याने सवर्ण हिंदुंना चीत करण्याचा तो काळ होता. सवर्ण हिंदुही घाव घालण्यास व डाव साधण्यास टपून होते. रायगडावर डॉसाहेबांच्यावर सवर्ण हिंदुंनी हल्ला चढविण्याचा बेत रचला होता. त्या प्रसंगी डॉँसाहेबांना
सुरक्षित ठेवण्यास ज्यानी घैर्यानें तोंड दिलें त्यापैकी मडकेबुवा प्रमुख होते.
दुसराही असाच प्रसंग आहे. महाड नजीक काळ्या सुकवली खिंडीत डॉसाहेबांची मोटार पाण्याच्या लोंढ्यामध्यें सांपडली होती. पाऊस व चिखल