परिशिष्टे - Page 626

५८४ डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

केली. त्या प्रेरणेने फुरफुरलेले तरुण सामाजिक चळवळीच्या आखाड्यात उतरले. त्यात पुण्याचे श्री. शिवराम जानबा कांबळे हे प्रमुख होत, ते लहानपणी एका युरोपियनाकडे नोकरी करीत होते. तरुणपणात अस्पृश्योत्रतीची चळवळ सुरू केली, प्रो, राजारामशास्त्री, लोकहितवादी बाबा पदनमजी, आगरकर, फुले वगैरे समाजसुंधारकांचे लेख व पुस्तके वाचून त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेबद्दलचा आपला दृष्टिकोन बनविला. पुढे त्यांनी अस्पृश्यांच्या हितासंबंधी वर्तमानपत्रात लेख लिहिण्यास सुरुवात केली.

त्यांचा पहिला लेख कोल्हापुरात प्रसिद्ध होत असलेल्या 'मराठा दिनबंधु' या पत्रात ऑक्टोबर १९०२ मध्ये प्रसिद्ध झाला होता. आपल्या लोकांना लष्कर व पोलिस खात्यात नोकऱ्या मिळाव्यात व मुलामुलींचे शिक्षण सरकारने पत्करावे, यासंबंधी सरकारला wee विनंती करण्यासाठी त्यांनी सासवड येथे ता. २४-११-१९०२ ला ५१ गावच्या महार लॉकांची सभा भरविली, अस्पृश्यांच्या हितासाठी सरकारने काय काय कार्य करावे, याबद्दलचा उहापोह करणारा अर्ज कांबळे यांनी तयार करून, त्यावर १५८८ महारांच्या. सह्या घेतल्या व तो अर्ज सरकारकडे पाठविला. अस्पृश्यांतर्फ सरकारला गेलेला हाच पहिला अर्ज होय, या अर्जाच्या इंग्रजी प्रती इंग्लंडमधील ब हिंदुस्थानातील प्रमुख गृहस्थांकडे व इंग्रजी प्रती वर्तमानपत्रांकडे पाठविल्या होल्या; पण सरकारने त्या अर्जाला वाटांण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे चिडून श्री, आगरकर यांनी 'सुधारका' च्या ता १४-११-१९०४ च्या अंकात, 'महारांचा अर्ज, सरकार आणि आपला समाज” या मथळ्याखाली सरकारावर एक कडक स्फुट लिहिले, या अर्जाचा विचार सरकारने सहानुभूतिपूर्वक केला नाही, म्हणून इतर वर्तमामपत्रांनीही सरकारवर टीका केली

कांबळे यांनी ता, १ जुलै १९०८ ला 'सोमवेशीय मित्र' या नावाचे गासिक सुरू केले. त्याची वार्षिक वर्गणी ८ आणे होती, या मासिकातून त्यांनी. अस्पृश्य वर्गाच्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अनेक लेख लिहिले व त्यांनी समाजसुधारणेसाठी चालविलेल्या चळवळीचे वृत्तांत या मासिकाद्वारे प्रसिद्ध केले. अस्पृश्य जात्तीत देर्वीना मुली व मुलगे वाहण्याची जी दुष्ट रूढी होती, तिच्याविरूद्ध त्यांनी जोरात चळवळ केली. मुरळ्या व जोगत्या म्हणून देवींना मुली सोडणे व त्या उपवर झाल्यानंतर त्यांच्या देहविक्रयावर त्या मुलींच्या नातलगांनी जगणे, ही रूढी अत्यंत अमानुष, तिरस्करणीय व समाजहितबाधक आहे, अशी त्यांनी चळवळ केली. तेव्हा काही मुरळ्या जोगत्या आपला पेशा सोडून लग्ने करुन संसारी जीवन कंठण्यास तयार