व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५८५
झाल्या. अशा स्त्रियांपैकी शिवुबाई लक्ष्मण जाधव था एका बाईने विवाह करून संसारास सुरुवात केली, तेव्हा तिने श्री, कांबळे यांचे आभार मानणारे व इतर मुरळ्यांना व जोगतीणींना आपले अतुकरण करा असा उपदेश करणारे पत्र कांबळे यांना उद्देशून लिहिले. ले पत्र कांबळे यांनी 'सोमवंशीय मित्र' या मासिकाच्या ता. १ डिसेंबर १९०८ च्या अंकात प्रसिद्ध केले, यामुळे अस्पृश्य समाजात बरीच खळबळ झाली. काही देवदासींनी शिवुबाईचा कित्ता गिरविला.
१९०२ साली अहमदनगर येथील सार्वजनिक हौदात गोविंद वल्लभ मुकुंदा महार या गृहस्थाने आपला पोहरा सोडून स्वतः पाणी काढले व ते पाणी तेथेच प्यायला. हा प्रकार पाहून नगरातील सवर्ण हिंदूच्या अंगाचा तिळपापड उडून गेला. नगरातील धर्ममातंडांनी हौद 'भ्रष्ट' केल्याबद्दल गोविदावर इं. पि. कोंडाच्या २७७ कलमाखाली कोर्टात फिर्याद ठोकून दिली. आरोपीचा बचाव व्हावा म्हणून महाराष्ट्रातील महारांनी सरकारकडे विनंतीअर्जाची भेंडोळी पाठवून दिली. बचावमदतीचा फंड उमारला. त्यावेळचे नगरचे मॅजिस्ट्रेट बापू हरी गोडबोले (दुसरा वर्ग) यांच्यापुढे खटला चालला व त्यात त्यांनी आरोपीला दोन आठवड्याची साधी कैद व आठ रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सदर शिक्षा अन्यायमूलक आहे, अशी त्यावेळचे नगरचे कलेक्टर सर रिचर्ड यांनी हायकोर्टाकडे तक्रार केली. हायकोर्टाने गोविंदाला झालेली शिक्षा रद्द केली व त्याला दोषमुक्त केले. गोविंदाचा खटला त्यावेळी महाराष्ट्रात फारच गाजला. त्या खटल्याची माहिती कांबळे यांनी 'सुचिपत्र' या नावाच्या आपल्या छोट्या पुस्तकात दिली. सरकारी व गावकरी यांच्या कामानिमित्त ner लोकांवर ठिकठिकाणी कसै अन्याय होतात, याची प्रत्यक्ष उदाहरणे गोळा करून कांबळे यांनी सदर पुस्तकात ती गोवली. महार लोकांवर होत असलेल्या अन्यायांना जनतेत प्रसिद्धी मिळावी म्हणून कांबळे यांनी सदर पुस्तक छापून त्याच्या प्रती गावोगावी
वाटल्या.
कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने १९०४ ला पुणे येथे “श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितर्चितक मित्र समाज' ही संस्था स्थापन केली; व “ श्री सच्चिदानंद वाचनगृह " उघडले ते आपल्या समाजात जागृती करीत जसत.”
ति वि GNP लत त य हह बब बे I Nn E T A A ae aaa aoaaa
` खैरमोडे, खंड १ला, ए. १९५-१९७.