ues डॉ. बाडासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कीर, भागोजी बाळूजी (१८६९-१९४४) :--इमारती बांधणारे ठेकेदार, चाफ्याची फुले विकणारा व चर्नी रोड स्टेशनवर हमाली करणारा गरीब मनुष्य कर्तुत्व व प्रामाणिकपणाच्या बळावर मोठा श्रीमंत झाला. अनेक ठिकाणी धर्मशाळा, देवळे व शाळा उदारपणे बांधून दिल्या, दानशूर म्हणून प्रसिद्ध, रत्नागिरीत समाजक्रांतींचे प्रतीक असे पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
इच्छेप्रमाणे बांधून दिले.
भागोजी कीरांनी रत्नागिरी किल्ल्यावर श्रीभागेश्वर मंदिर बांधले होते. तेथे ते दर महाशिवरात्र मोठ्या थाटामाटाने करीत. एकदा त्यांनी स्वा, सावरकरांना उत्सवासाठी बोलाविले. तेव्हा बोलताना सावरकर म्हणाले, “अखिल हिंदूमात्रांस देवपूजा व प्रार्थना सांधिकपणे, एकत्र व समतेने करता यावी असे पतितपावनाचे मंदिर आपण बांधावे.” भागोजी शेठनी या विनंतीचा आज्ञा म्हणून स्वीकार केला. भागोजी कीरांना पसंत असलेली जागा रत्नागिरी हिंदु सभेने दिली. २२ फेब्रुवारी १९३१ रोजी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
ऊन 'पतितपावन मंविरा' चे स्वप्न पूर्ण झाले.
केतकर, गजानन विश्वनाथ (१८९८-१९८०) :--केसरीचे संपादक व विश्वस्त, हिंदुत्ववादी सार्वजनिक कार्यकर्ते, लो. टिळकांच्या ज्येष्ठ कन्येचे पुत्र, १९३५ पासून ` मराठा ' ह्या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक, पहिली पत्नी निर्वतल्यावर १९५० मध्ये हिंदू करून घेतलेल्या एका युरोपियन स्त्रीशी दुसरा विवाह. त्यामुळे काहूर माजून केसरीचे संपादकत्व सोडावे लागले, १९५७ पासून पुण्याच्या “तरुण भारता' चे संपादकत्व स्वीकारले.
केळकर, नरसिंह चित्तामण (१८७२-१९४७) :--मिरज संस्थानात मोडनिंब येथे जन्म. राजकारणी व साहित्यिक, केसरी, मराठा व wan यांचे संपादक. १९१९ मध्ये इंग्लंड येथे काही काळ ' इंडिया ' या पत्राचे संपादक. बडोद्यास भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, १९२१ मध्ये, १९३२ च्या तिसऱ्या गोलमेज परिषदेत एक प्रतिनिधी म्हणुन उपस्थिती. काँग्रेस डेमोक्रंटोक पक्षाची स्थापना. केसरी संस्थेतून निवृत्तीनंलरं शेवटपर्यंत अव्याहत लेखनवाचन. वाङ्मयाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय व उल्लेखनीय कामगिरी, त्यागुळे लोकांकडून 'साहित्य ware’ ही पदवी. स्वभावाने टिळक परंपरावादी पण मवाळ व थंड. लो. टिळक चरित्र, गतगोष्टी इत्यादि ग्रंथांचे लेखक. |