परिशिष्टे - Page 629

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५८७

गिरणी कामगार युनियन संघ :--मे १९२८ मध्ये मुंबई गिरणी कामगारांनी सप केला होता आणि २२ मे १९२८ रोजी ' गिरणी कामगार युनियन रांघा' ची स्थापना झाली. त्यांच्या कार्यकारिणीत के. नी. जोगळेकर, शां. सा मिरजकर, श्रीपाद डांगे, ब्रेंडला आदि होते. या संपाबद्दल बोलतांना डांगे म्हणाले होते की, ' हा संप आमची निर्मिती नव्हती तर आम्हीच संपाची Pe

होतो. '

गोरा कुंभार (१२६७-१३१७) :--एक मराठी संत. पंढरपूरजवळील तेरढोकी येथे तो राहत असे. जातीने तो कुंभार होता आणि त्याला संती व रामी नावाच्या दोन बायका होत्या. आपले काम करीत असता तो विठ्ठलाचे नामरमरण करी. एकदा माती तुडविताना तो नित्याप्रमाणे नामस्मरणात तल्लीन झाला आणिः त्याने रांगत आलेले स्वतःचे लहान मूल पायाखाली तुडविले, अशी आख्यायिका आहे. त्याच्याबाबत इतरही आख्यायिका रुढ आहेत.

ज्ञानेश्वरादी संत मंडळीत तो सर्वात वडील होता आणि सर्व जण त्याला गोरोबा काका म्हणत. नामदेव परमार्थात कच्चा आहे की पक्का, हे ठरविताना गोरोबाचे मत प्रमाणभूत मानले गेले. त्याने आपल्या स्वानुभवाच्या थोषटण्याने मडके वाजवून योग्य तो निर्णय दिला, असे म्हटले जाते. त्याचे फक्त वीसच अभंग उपलब्ध आहेत. त्यांत त्याने नामदेवाचा मोठ्या प्रेमाने वारंवार उल्लेख केला आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या उद्धवचिद्धनाने त्याचे मराठीत ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. तेरढोकी येथे त्याची समाधी असून तेथील त्याचे घर त्याचप्रमाणे मूल तुडविलेली जागा आजही लोक दाखवितात.

गुरु चरित्र :--महाराष्ट्रातील अत्यंत you मानलेला मराठीतील पुराणग्रंथ. सरस्वती गंगाधर नावाच्या कवीने लिहिला, त्यात नरसिंह सरस्वती या १७ व्या शतकात होऊन गेलेल्या एका स्वामीचे चरित्र आहे. हा ग्रंथ शके १४४० ते १४७० च्या दरम्यान लिहिला गेला. त्यात तत्कालीन परिस्थितीचे चित्रण केले असून मुख्यतः ब्राह्माणांच्या आचारधमचि विस्तृत विवेचन केलेले आहे, स्त्रीजातीला हा ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही.

चक्रधरस्वामी :--जातिभेदाविरुद्ध उभे केलेले तिसरे बंड चक्रधराचे, चक्रधर स्वामी महानुभावी पथाचा संस्थापक ब प्रवर्तक, गुजराथेतीलं भडोचच्या मल्लदेव

"कशा 0000 “ककत oe ammen ECO OR ne meee eA ie ia हलका? ने rennet ene शी 000) 0 0 0 e ८0१0

A : fe मराठी = रि विश्वकोश ars 4 पु. २०१४, R