परिशिष्टे - Page 630

डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५८८

त्याचा चक्रधर हा राजाचा विशाळदेव नामक सामवेदी लाड ब्राह्मण होता,

मुलगा. हरपाळदेव हे त्याचे मूळ नाव” (विचार-समीक्षा. पा. २२). त्यांचा जन्म भडोच येथे शके १११६ (इ. स. ११९४) मध्ये झाला. ते शके ११४५ (इ. स. १२२३) मध्ये महाराष्ट्राल आले. महाराष्ट्र हाच प्रदेश आपल्या कार्याला योग्य आहे असे ठरवून त्यांनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ स्थापन केला व वाढविला. ते गुजराती असूनही त्यांनी आपला उपदेश मराठीतून दिला, (इ. स, ११८१ - इ. स. १२६७). ते शके ११९६ (इ. स. १२७४) सालात दिवंगत झाले. ते ज्ञानदेवाच्या अगोदर ७१ वर्ष जन्मले व २१ वर्षे अगोदर दिवंगत झाले. त्यांच्या हयातीत एकही महानुभावी पंथीय ग्रंथ लिहिला गेला नाही. परंतु त्यांनी वेळोवेळी जो उपदेश केला, त्यातील सुत्रमय वचने पुढे त्यांच्या शिष्यांनी एकत्र करून एक ग्रंथ तयार केला. त्याला सूत्रपाठ हे नाव दिले, तो महानुभावांचा वेद, “जातिभेदाचा उच्छेद करा,” असे सूत्रपाठात स्पष्ट म्हटले नसले, तरी पण 'चातुरिवर्णाचरित भीक्षा या शास्त्रास आनुसारिजे ' (आ. ८१) हे सूत्र जातिभेदाला निःसंशय (चातुर्वर्ण्य चरेद्भक्ष्यम्‌) प्रतिकूल आहे. मात्र चक्रधराच्या शिष्यांत संन्यास दीक्षा घेतलेले पूर्वाश्रमीचे ब्राह्मण पुष्कळ होते. त्यांनासुद्धा सर्वच शिष्यांना 'तुम्ही चारही वर्णाच्या हातचे भिक्षान्न ग्रहण करा-' असे चक्रधर सांगतो. तेव्हा तो अन्न-व्यवहारापुरता तरी जातिभेद मानीत नव्हता, हे उघड आहे. शंकराचायनिं ब्राह्मणाखेरीज इतरांना संन्यास Sera अधिकार ठेवला नव्हता; पण हे तत्त्व स्वतः चक्रघरामे कधीच धाब्यावर वसविले नसते, तर त्याच्या पश्चात त्याच्या प्रत्येक शब्दाला वेदवाक्य मानणाऱ्या महानुभावपंथीय आचार्यांनी कोणताही वर्ण वा जाल न पाहता वाटेल त्याला आपल्या गोटात घेऊन त्याला संन्यास देण्याचा जो धूमधडाका चालविला होता, तो त्यांनी तसा चालविला असता काय ? यावरूनही चक्रधर जातिभेदाचा पुरस्कर्ता नव्हता, असेच अनुमान निघते. जनरूढीविरुद्ध एकजात सर्वानाच संन्यास दीक्षेची मोकळीक ठेवावयाची, आणि वर 'लुम्ही चारही वर्णाच्या हातचे भिक्षात्र ग्रहण करीत जा ' असा उपदेश करावयाचा हा जातिभेदावर उघड उघड हल्ला होता. मुख्यतः या हल्ल्यामुळेच नामदेवापासून महानुभाव पंथावर कोरडे ओढण्याची सनातनी वर्गात प्रवृत्ती उत्पन्न झाली.” -(विचारसमीक्षा)

श्री. देशपांडे यांच्या मते चक्रधर वेदादी हिंदू धर्मग्रंथांना aria असे.

डॉ. वि. भि. कोलते यांनी ज्ञानदेव व चक्रधर यांच्यासंबंधी मुंबई मराठी

ग्रंथसंग्रहालयाच्या ५३ व्या वार्षिकोत्सवात वागळे हॉलमध्ये ता. २३ व २४

नोव्हेंबर १९५० रोजी जी व्याख्याने दिली त्यांत त्यांनी स्पष्ट मत प्रदर्शित केलेले