नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 63

नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य २१

केलेली नवी प्रांतरचना केवळ प्रांतरचना भाषावार असावी, एवढ्याच तत्त्वानुसार करण्यांत आली आहे. भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व चांगले आहे. परंतु ते अमलांत आणल्याने या देशाचे अपरिमीत नुकसान होणार आहे असें आमचे प्रामाणिक मत आहे. या देशांत जर कोणत्या एकाद्या गोष्टीची उणीव असेल तर ती राष्ट्रीय भावनेची होय. ही राष्ट्रीय भावना या देशांत उद्‌भवली नाहीं याची जी अनेक कारणें आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे अनेक भाषा हे होय. हे कारण नष्ट झाल्याशिवाय राष्ट्रैक्याची भावना जनतेंत उत्पन्न होणें [शक्‍य ] [नाहीं. ] भाषावार प्रांतरचना करणें म्हणजे ऐक्याच्या भावनेचे मुळावर [घाव ] [घालण्यासारखे ] आहे. कारण, जितक्या प्रमाणांत प्रांतिक भावनेचे पोषण [केलें ] [जाईल ] [तितक्या ] प्रमाणांत राष्ट्रीय भावनेचा कोंब सुकून जाणार [आहे. ] आहे त्या प्रांतरचनेंतून राष्ट्रीय भावना उद्भवली नाहीं हे खरें. परंतु भाषावार प्रांतरचना झाल्यानें ती कधींच उद्भवणार नाहीं. भाषावार प्रांतरचना करण्याच्या ऐवजीं [सर्व ] [राष्ट्राला ] एक भाषा प्राप्त होईल असा प्रयत्न करणें [यांत ] [खरें ] [राष्ट्र ] हीत आहे असें आम्हांस वाटतें. परंतु भाषावार प्रांतरचना बरी [कीं ] [वाईट ] [हा ] [प्रश्‍न ] [तुर्त ] [बाजूस ] [ठेवूं ] मुख्य प्रश्न आहे तो हा कीं, नेहरू कमिटीनें [ही ] [जी ] [प्रांतरचना ] [सुचविली ] [आहे ] [तिच्या ] मुळाशीं भाषावारीचें तत्त्व आहे [किंवा ] [दुसरें ] [कोणते ] [तत्त्व ] [आहे ] [? ] [कमिटीचा ] रिपोर्ट वाचून आमचें जें मत [बनलें ] [आहें ] [तें ] [हें ] [कीं, ] [कमिटीच्या ] [मुळाशों ] [भाषावारीचें ] तत्त्व नाहीं. भाषावार प्रांतरचनेच्या [तत्त्वास ] [जर ] [कमिटी ] [अनुसरली ] [असती ] [तर ] या देशाच्या क्षेत्राचे एकंदरीत [१७९ ] [प्रांतवार ] [तुकडे ] [करावेत ] [अशी ] [योजना ] [कमिटी ] नें केली असती, कारण या देशांत [तितक्या ] [भाषा ] [बोलणारे ] [लोक ] [आहेत. ] पण तशी योजना कमिटीनें केलेली [नाही. ] उलट भाषावार प्रांतरचना [करणें ] [अत्यंत ] [कठीण ] आहे याची जाणीव ठेऊन [भाषावार ] [प्रांतरचना ] [करण्याची ] [कांहीं ] [लोकांची ] [मागणी ] कमिटीनें फेटाळून लाविली [आहे. ] सिंध, बलूचिस्थान, वायव्य [सरहद्दीवरील ] [प्रांत ] या तीन क्षेत्रांनाहि त्यापैकी [कांही ] [अडचणी ] [लागूं ] [पडतात. ] परंतु त्या सर्व अडचणी बाजूस सारून या तीन [क्षेत्रांस ] [निराळ्या ] [प्रांतांचे ] [स्वरूप ] [देण्यांत, ] [भाषावारीच्या ] तत्त्वाशिवाय दुसरे [कांही ] [तरी ] [प्रबल ] [कारण ] [असावे ] [असा ] [संशय ] [साहजिकपणें ] येतो. भाषावार प्रांतरचना [करावयाची ] [होती ] [तर ] [वायव्यसरहद्दीवरील ] [प्रांत, ] [पंजाब ] व संयुक्तप्रांत यांची [एकच ] [भाषा ] [आहे. ] त्यांची हल्लीची [हदमर्यादा ] [मोडून ] निराळ्या मर्यादा [ठरवून ] [निरनिराळे ] [प्रांत ] [घडवितां ] [आले ] [असते. ] पण कमिटीने तसेंही केलें नाहीं. यावरून ही प्रांतरचना [भाषावार ] [नसून ] [दुसऱ्याच ] [कोणत्या ] [तरी ] तत्त्वानुसार करण्यांत आली [आहे ] [असा ] [ग्रह ] [कायम ] [होतो. ] हे तत्त्व कोणतें हे नेहरू कमिटीने छपवून [ठेविलें ] [असलें ] [तरी ] [म्हातारीनें ] [कोंबडा ] [झाकून ] [ठेविल्यामुळे ] [जसा ] सुर्योदय व्हावयाचा [राहीला ] [नाही ] [तसे ] [नेहरू ] [कमिटीने ] [झाकून ] [ठेविलेले ] [तत्त्व ]