परिशिष्टे - Page 631

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५८९

आहे की, चक्रधर वेदादी ग्रंथ मानीत नसत. आणि जातिभेदाचे ते कट्टर वेर होते. वेदात ईश्वरस्वरूपाचे ज्ञान नाही व ईश्वरप्राप्तीसाठी वेदांचा काही उपयोग नाही, असे चक्रधर मानीत असत. वेवादी घर्मग्रंथ व जातिभेद यावर चक्रधराने प्रखर टीका केली. त्यांची चळवळ व शिकवण ही त्राह्मणेतरातील बहुजन समाजात जोराने फैलावली व त्यामुळे वेदावी हिंदुधर्मग्रंथ व जातिभेदादी अनिष्ट रुढी यांच्याबद्दल बहुजन समाजात अनास्था उत्पन्न झाली. जनतेत पसरलेली ही अनास्था पाहून ज्ञानदेवामे हिंदुधर्माच्या प्रचाराचे कार्य हाती घेतले व त्या प्रचाराला अनुरूप असे ग्रंथ लिहिले. भावार्थदीपिका हा ग्रंथ लिहून ज्ञानदेवाने चक्रधराच्या विचारप्रणालीचे खंडन केले व हिदुघर्मातील वैद, वेदांगे, पुनर्जन्म, अवतार, कर्मवाद, मायावाद, चातुर्वर्ण्य, जातिभेद इत्यादी भावनांबद्दल जनतेत पुन्हा निष्ठा जागृत केली.

ज्ञानदेवांच्या धार्मिक चळवळीला हिंदू राजांचा सक्रिय पाठिंबा मिळाला. महानुभावी पंथातील लोकांनी हिंदूच्या अमानुष छळांना तोंड दिले, पण त्यांचे जातिभेद नष्ट करण्याचे कार्य सफल झाले नाही.”

चर्चिल, सर विन्स्टन (३० नोव्हेबर १८७४ - २४ जानेवारी १९६५). ।--- ब्रिटनचा युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू, त्यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल. ब्रिटनच्या प्रसिद्ध मार्लबरो या उमराव घराण्यात त्याचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला. वडील लॉर्ड रॅन्डोल्फ है एक तडफदार, बंडखोर गणले जाणारे संसदेचे सदस्य होते, तर आई जेनेट ही देखणी आणि न्यूयॉर्क येथील लेनर्ड जेरोम या लक्षाधीशाची मुलगी होती. साहजिकच विन्स्टन यांचे बालपण लाडात गेले व त्यास अमौपचारिक- रीत्या. घरातच प्राथमिक शिक्षण देण्यात आले.

प्राथमिक शिक्षणानंतर विन्स्टननी et या जगविख्यात विद्यालयात प्रवेश केला. एक अत्यंत हूड व अभ्यासात मागे, असा विद्यार्थी म्हणून विन्स्टन यांची प्रथम ख्याती होती. हेँरोमध्ये काही दिवस शिक्षण घेऊन त्यांनी सँढस्टच्या लष्करी शाळेत प्रवेश मिळविला. त्यांच्या स्वभावास जुळेल असे वातावरण व आवडता विषय मिळाल्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तेथे झपाट्याने विकास होऊ लागला. लष्करी शिक्षणानंतर १८९४ मध्ये त्यांनी चौथ्या हुस्सार पलटणीमध्ये प्रदेश मिळविला. नुसते सैनिक म्हणून जगण्यात त्यांना समाधान नव्हते, म्हणून १८९५ सध्ये त्यांनी क्यूबा येथील बंड शमविण्यात स्पेन सरकारच्या वतीन भाग — oe een eo oo -

GRAS, खंड १ ला, पृ. ११७-११८,

वाय ६४१-४०