५९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
घेतला. ह्या वेळी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातून युद्धाचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय जीवनास प्रारंभ केला. पुढील वर्षी त्यांची नेमणूक भारतात झाली. मालकंद खोऱ्यातील एका लहानशा. लढाईत त्यांनी भाग घेतला आणि अलाहाबादच्या पायोनिअर पत्रासाठी इतिवृत्ते पाठविली. ह्या लढाईवर द स्टोरी ऑफ द मालकंद फील्ड फोर्स (१८९८) हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्य क्षेत्रात पदार्पण केले. सेनापती किचनेरच्या मनाविरूद्ध त्यांनी १८९८ मध्ये सूदानच्या मोहिमेत भाग घेतला, तसेच त्या वर्षी ते बोअर युद्धाच्या प्रसंगाने दक्षिण आफ्रिकेत मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून गेले. तिथे ते शत्रूंच्या हातात सापडले. युद्धकैदी असताना विलक्षण धाडसाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा सैन्यात प्रवेश करून बोअर युद्धात ब्रिटिशांना यश मिळवून देण्यात हातभार लावला.
हुजुर पक्षातर्फे १९०० मध्ये ते ब्रिटिश संसदेवर निवडून आले. संसदेत एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली. खुल्या व्यापाराचा त्यांनी पुरस्कार केला व १९०३ मध्ये जोसेफ चेंबरलिनच्या जकात धोरणाला कसून विरोध केला. ह्या बाबतीत हुजूर पक्षाशी न पटल्यामुळे त्यांनी तौ पक्ष सोडून उदारमतवादी पक्षात प्रवेश केला. १९०६ च्यां सार्वत्रिक निवडणुकीत उदारमतवाद्यांना फार मोठे बहुमत मिळाले. लवकरच त्यांची वसाहतींचा उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. या वेळी त्यांनी लॉर्ड रॅन्डॉन्फ (१९०६) हे चरित्र लिहिले. चर्चिल यांना ब्रिटिश मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला. एक दोन. अषयाद सोडला १९०६ पासून १९५५ पर्यंत चर्चिल कोणत्या ना कोणत्या तरी खात्याचे मंत्री होते.
नौदलाचे १९११ मध्ये मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी,थोड्या काळातच नौदलाची पुनर्रचना केली. यामुळे पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटिशांचे नौदल सुसज्ज झाले होले. नौदलाला वायुदलाची जोड देण्याची कल्पना काढून त्यांनी जर्मन चढाई थोपवून धरली, दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीतून तुर्कस्तानवर हल्ला करण्याची त्यांची योजना अयशस्वी झाली आणि गलिफलीच्या सुप्रसिद्ध लढाईत (१९१५) ब्रिटिश सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार झाला. ह्याचा दोष साहजिकच चर्चिलवर लादण्यात आला.
रशियन क्रांतीस त्यांनी कडवा विरोध करून डाव्या लोकांचे शत्रुत्व पत्करले.
मजूर पक्षाचा नेता रेंम्से मॅक्डॉनल्ड ह्यांच्या विषयी त्यांचे प्रथमपासूनच वाईट मत होते. त्यामुळे १९३२ च्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात Fees यांनी त्यांस