व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 633

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५९१

कोणतेच मंत्रिपद दिले नाही, हिंदी स्वातंत्र्याचे ते कट्टर विरोधक असल्यामुळे भारतास थोडे तरी अधिकार देण्याचे हुजूर पक्षाचा नेता बाल्डवीन ह्याचे धोरण होते; ते त्यांस मान्य नव्हते. एवढेच नव्हे तर पुढे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी अत्यंत बिकट परिस्थितीतसुद्धा त्यांनी हा अट्टाहास सोडला नाही. ते म्हणत मी काही ब्रिटीश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी इथे बसलो नाही, म्हणून १९३५ च्या हुजूर पक्षाच्या मंत्रिमंडळातही त्यांना घेण्यात आले नाही, ह्या वेळी हिटलरच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालणे आवश्यक आहे, असे ते प्रतिपादित. एवढेच नव्हे तर, हिटलरं जगावर सर्वकष युद्ध लादणार असे युद्धाच्या अगोदर ३-४ वर्षे चर्चिल्ल यांनी भाकित केले होते. पण त्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. या काळात त्यांनी आणखी एक पुस्तक मार्लबरो : हिज लाइफ अँड टाईम्स (४ खंड, १९३३-३८) लिहिले. वरील दोन dares त्यांस भरपूर आर्थिक लाभ झाला आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा नावलौकिक वाढला.

दुसरे जागतिक युद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. चर्चिल यांना प्रथम आरमार खात्याचा मंत्री म्हणून बोलाविण्यात आले आणि वर्षाच्या आतच १९४० मध्ये त्यांची नेमणूक संमिश्र सरकारात पंतप्रधान म्हणून झाली. ही वेळ ब्रिटिश साम्राज्याची काळवेळ होती. हिटलरचे विजयी सैन्य चौफेर चढाई करीत होते व पोलंड, हॉलंड, बेल्जियम, नार्वे, फ्रॉन्स अशा देशांनी एकापाठोपाठ एक शरणागती पत्करली होती. जर्मनीच्या अमानुष विस्ताराला आळा घालून _ लोकशाहीचे संरक्षण करणे, हा तत्कालीन लोकशाहीवादी [राष्ट्रांचा ] [मुख्य ] [उद्देश ] होता. आपल्या पहिल्या भाषणातच त्यांनी रक्त, [अश्रु, ] [श्रम ] [व ] [घाम ] [यांखेरीज ] _ माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही, असे तडफदारपणे [सांगून ] [ब्रिटीशांची ] विजिगीषु वृत्ती उत्तेजित केली, ह्याच झुंजार वृत्तीने इंग्लंडने त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमेरिका युद्धात पडेपर्यंत एकट्याने लढत दिली. पुढे त्यांनी अमेरिकेची मैत्री संपादन केली. एवढेच नव्हे, तर साम्यवादाबद्दल अंतरी [द्वेष ] असतानाही त्यांनी स्टालिनशी हातमिळवणी करून [रशियाबरोबर ] [मैत्रीचे ] [संबंध ] प्रस्थापित केले आणि इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका [या ] [तीन ] [बड्या ] [राष्ट्रांत ] (थ्री fara) रशियास घेऊन जर्मनीविरूद्ध फळी उघडली. डंकर्क येथील पराभवाने न डगमगता जपान व [जर्मनीचा ] [जमेल ] [तिथे ] [पराभव ] [करून ] [ब्रिटनचे ] नैतिक धैर्य त्यांनी कधीही खचू दिले नाही.

इंग्लंडच्या आणि जगाच्या इतिहासात चर्चिल यांचे युद्धकालीन नेतृत्त्व असामान्य