व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 634

422 डॉ. वाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे

ठरले. पण जर्मनीबरोबरची युद्धसमाप्ती होताच जपानचा पराभव होण्याच्या आधीच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा संसदेत पराभव झाला आणि मजूर पक्षाला १५० मतांचे गताधिक्य मिळाले, ह्यानंतरधी सहा वर्ष विरुद्ध पक्षाचा पुढारी म्हणून त्यांनी संसदेत काम केले. ह्याच काळात मार्च १९४६ मध्ये अमेरिकेतील बोस्टन या शहरी भाषण करताना त्यांनी आगामी शीतयुद्धाच्या धोक्याची जाणीव करून दिली. १९५१ मध्ये ते पुन्हा हुजूर पक्षाच्या मताधिक्याने पंतप्रधान झाले. पुढे ५ एप्रिल १९५५ रोजी प्रकृतीच्या निमित्ताने तै निवृत्त झाले, या काळात त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास द सेकंड वर्ल्ड वार (६ खंड, १९४८-५३) या शीर्षकाने प्रसिद्ध केला व इंग्रजी साहित्यात फार मोलाची भर घातली, याबद्दल त्यांस साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले (१९५३). उर्वरित आयुष्यांत त्यांनी लेखन व चित्रकला यांना वाहून घेतले. ए हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल्स (४ खंड, १९५६-५८) है इंग्लंडच्या इतिहासाविषयीचे पुस्तक लिहिले आणि आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविले.

लढाईनंतर त्यांना उगरावपद देण्याची सहावे जॉर्ज यांची फार इच्छा होती, पण त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्स ही सभा सोडण्याचे नाकारले,

त्यांच्या इतके दीर्घकाळ मंत्रिपद जगातील कोणाही राजकारणी पुरुषाला अद्यापि लाभले नाही. लढवय्या, साहित्यिक, वृत्तपत्रकार, चित्रकार, वक्ता आणि कुशल राजकारणी असा बहुविध मान त्यांना मिळाला. एक बहुश्रुत धुरंधर म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. ते लंडन येथे मृत्यू पावले. त्यांचा सरकारी. इतमानाने अंत्यविधी झाला.

* चतर्जी, रामानंद (१८६५-१९४३) :-हिंदुस्थानातील जगद्विख्यात संपादक व राष्ट्रीय वृत्तीचे गृहस्थ. बंगालमधील सुप्रसिद्ध चट्टोपाध्याय नावाच्या ब्राह्मण कुलात जन्म. कलकत्ता येथे कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच * दासी ' या नियतकालिकचे हे संपादन करीत. नंतर प्रथम प्रयाग येथील कायस्थ कॉलेजात प्राध्यापकाचे काम केले. मग अलाहाबाद विश्वविद्यालयात फेलोही झाले. पण पुढे संपादकीय व्यवसायच स्वीकारला. काहो दिवस ' इंडियन मेसेंजर ' या पत्राचे संपादक होते. पुढे यांनी ' प्रदीप ' नावाने नियतकालिक व १९०१ मध्ये ` प्रवासी ' नावाचे बंगाली मासिक सुरु केले. पुढे १९०७ मध्यै सुप्रसिद्ध आंग्ल मासिक ' मॉडर्न रिव्हयु ` सुरु केले. पैकी शेवटची दोन दीर्घकाल

` : मराठी विन्वफोश . ५, पू. ६३९-६८१.

* गराठी विश्वकोश : ६, पृ. ९३४.