व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५९३
चालून त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत महत्त्वाचे स्थान पटकाविले. हे ब्राम्हो समाजाचे कर्ते अनुयायी व राजकारणात पूर्ण स्वातंत्र्यवादी. होते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या स्वराज्याच्या चळवळीस यांनी * Towards Home Rule ' ही ग्रंथमाला सुरु करून उत्कृष्ट साहाय्य केले. तसेच मि. जे. टी. सदरलँन्ड यांचे ' इंडिया इन बॉण्डेज ' हे पुस्तक प्रकाशित करून येथील ब्रिटीश राजनीतीवर झगझगीत प्रकाश टाकला. सरकारने ते पुस्तक शेवटी जप्त केले. हे राष्ट्रसभेचे अनुयायी होते. तथापि राष्ट्रसभेचे मुसलमानविषयक धोरण यांना पसंत नसल्यामुळे, हे हिंदुसभेत प्रविष्ट झाले. सुरत येथील अखिल भारतीय हिदुमहासभेच्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते (एप्रिल १९२९).
चेट्टी, सर त्यागराय (१८५२-१९२५) :-दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळीचे कर्णधार. त्यागी व दानशूर पुरुष. स्वतःचा पक्ष निवडून आल्यावरही स्वतः दिवाणपद स्वीकारले नाही.
जयकर, बे. मुकुंदराव रामराव (१८७३-१९५९) :-ब्राह्मणेतर ऐक राजकारणी, समाजकारणी व जागतिक कीर्तीचे कायदेपंडित. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक. राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख पुढारी म्हणून लंडनच्या गोलमेज परिषदेत एक प्रतिनिधी. १९४८ साली स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाचे काही वर्षे कुलगुरु. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. फर्ड वक्ते म्हणून प्रसिद्ध.
जेधे, केशवराव मारुतीराव (१८९६-१९५९) :-सुरुवातीच्या कारकीर्दीत ब्राह्मणेतर पक्षात असलेले सत्यशोधक समाजाचे कट्टर पुरस्कर्ते, पुढे काँग्रेसचे पुढारी. १९२३ मध्ये ' तरुण मराळा पक्षा ' ची स्थापना व ' शिवस्मारक ' साप्ताहिकाची सुरुवाल. १९२४ मध्ये ' मजूर ' नावाच्या दैनिकाची सुरुवात. दिनकरराव जवळकरांच्या सोबतीने मुंबईत ' कैवारी ' नावाच्या साप्ताहिकाची सुरुवात. पुढे दोघांत वितुष्ट. मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे प्रवर्तक. १९३३ मध्ये हरिजन सेवक संघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष. १९३५ मध्ये काँग्रेसतर्फे मध्यवर्ती असेंब्लीत निवड. काही काळ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पुढे कॉँग्रेस सोडून बहुजनपक्षाची स्थापना व शेतकरी, कामकरी लोकांची संघटना.
ठक्कर, अमृतलाल विठ्ठलदास (२९ नोव्हेंबर १८६९-१९ जानेवारी १९५१): :-- गुजरातमधील समाजसुधारक. 1 ठक्करबाप्पा ? या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते ` एल.सी.ई ' (१८९०). पुढे त्यांनी वढवाणं व पोरबंदर ह्या संस्थानांत