व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 636

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ५९४

(१८९८-९९), पूर्व आफ्रिकेतील युगांडा रेल्वेत (१८९९-१९०२) व सांगली संस्थानात

ते मुंबई नौकरीस (१९०४-१९०५) अभियंता म्हणून कामे केली. महानगरपालिकेत

स्थितीकडे होते. ही नोकरी करीत असतानाच अस्पृश्य जातींच्या अवनत त्यांचे लक्ष गेले व त्यांच्या उद्धारासाठी ते झटू लागले. १९१४ साली मुंबई महानगरपालिकेची नोकरी सोडून ते ' भारत. सेवक समाजा ' चे सदस्य बनले. आसाम, उत्तर प्रदेश, प. बंगाल, गुजरात व ओरिसा या राज्यांत त्यांनी दुष्काळं-निवारणाचे कार्य केले. ओरिसात असताना त्यांनी पंचमहाल जिल्ह्यातील | भिल्लांचे जीवन जवळून पाहिले व त्यांचे लक्ष हरिजनांकडून गिरिजनांकडे वळले त्यांनी ' भिल्ल सेवा मंडळ ' व ' अंत्यज सेवा मंडळ ' यांची स्थापना केली (१९२३-२५). भिल्ल समाजातील अज्ञान आणि व्यसनाधीनता दूर करणे,

त्यांच्यावरील अन्याय दूर करणे यांसाठी त्यांनी परिश्रम केले. अस्पृश्यांसाठी विहिरी व भंग्यांसाठी धर्मशाळा बांधण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. म. गांधींनी चळवळीशी संबंध नसतानाही त्यांना सरकारने पकडून शिक्षा केली;

` पण पुढे अपीलात ते सुटले (१९३०) जातीय निवाड्यांतील अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द व्हावेत म्हणून म. गांधींनी जी चळवळ केली; तीमध्ये सर्वांत मोठा वाटा ठक्करबाप्पांनी उचलला. ' हरिजन सेवक der’ चे ते १९३२ मध्ये मुख्य कार्यवाह झाले. १९३७ साली काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली, _ तेव्हा निरनिराळ्या प्रांतांतील हरिजन, आदिवासी इ. मागासलेल्या लोकांचे पाहणी करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविण्यात आले व ते त्यांनी अतिशय कसोशीने पार पाडले. पुढे १९५० साली देशभर हिंडून त्यांनी आदिवासी लोकांची माहिती गोळा केली. ' तिच्या आधारेच आदिवासींचे कल्याणविषयक कायदे पुढे तयार करण्यात आले. .त्यांनी ' आदिवासी सेवा मंडळा * ची स्थापना केली. त्यांची राहणी अतिशय साधी होती.

डांगे, कॉम्रेड श्रीपाद अमृत (१८९९) :-एक हिंदी कम्युनिस्ट पुढारी व

समाजकार्यकर्ते, मुंबईच्या विल्सन कॉलेजात आल्यासून इंग्रजीत लिहिण्याचा, बोलण्याचा व कविता करण्याचा सराव. १९२२ साली ' सोशलिस्ट ' पत्र

काढून समाजवादी मताचा प्रसार केला. सहकाऱ्यांच्या मदतीने कानपूर येथे ५९२५ मध्ये ' कम्युनिस्ट ' पार्टीची स्थापना. ' मीरत केस ' प्रकरणी १९२९

साली १२ वर्षांची शिक्षा. परंतु अपिलात ती शिक्षा ३ वर्षांची ठरून १९३५ साली सुटका. नंतर “क्रांति! ह्या मराठी व “नेशनल फ्रंट ' ह्या इंग्रजी

साप्ताहिकांचे प्रकाशन. १९३९ साली मुंबईस महागाई भत्यासाठी ऐंशी हजार

१ : मराठी विश्वकोश : ६, पृ. ९३४.