व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 637

व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५९५

कामगारांच्या प्रचंड संपाचे नेतृत्व, पॅरिस येथे भरलेल्या जागतिक कामगार परिषदेत सर्व वसाहतींचे पुढारी बनले व वसाहतींच्या स्वातंत्र्याला मान्यता मिळविली. लेनिन व गांधी, वैदिक कालाचा इतिहास इत्यादि पुस्तके लिहिली.

तुकाराम (१६०८-९ मार्च १६५०) :-वारकरी संप्रदायाच्या चार श्रेष्ठ संतांपैकी

अखेरचे संतकवी. पित्याचे नाव बोल्होबा किंवा बाळोबाबावा; मातेचे कनकाई. कुलनाम मोरे; उपनाव अंबिले. तुकाराम महाराजांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथला. आपल्या जातीचा ते शूद्र वा कुणबी असा उल्लेख करतात. '

तुकाराम महाराजांच्या पूर्वीच्या आठ पिढ्यांची माहिती मिळले. त्यांच्या पूर्वीच्या आठव्या पिढीचे प्रमुख विश्वंभर त्यांना एका शेतात विठ्ठल रखमाईच्या मूर्ती सापडल्या. नदीकाठावरील एका घरात त्या मूर्तीची त्यांनी प्रतिष्ठापना ` केली. ह्या घरास ' देऊळवाडा ' असे म्हणत असत.

तुकाराम महाराजांची वंशावळ अशी: विश्वंभर--हरी--विठोबा -पदाजी-- शंकर--कान्होबा--बोल्होबा आणि तुकाराम महाराज चैतन्य. तुकाराम महाराजांच्या आईला सावजी, तुकाराम आणि कान्होबा असे तीन मुलगे झाले. तिला दोन मुलीही झाल्या, असे काही संशोधक सांगतात.

तुकाराम महाराजांचे शिक्षण तत्कालीन .सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तीप्रमाणे झाले होते, असे दिसते. त्यांच्या साहित्यात संस्कृत-प्राकृत ग्रंथांच्या व्यापक अध्ययनाची आणि सखोल व्यासंगाची अनेक प्रमाणे मिळतात. भक्तिमार्गात असताना पातंजल योगमार्गाचाही त्यांना बोध झाला होता, असे काही अभंगांवरून दिसते. मालकीचे पांडुरंगमंदिर असल्याने तेथे होणारी नित्यनैमित्तिक भजने, कीर्तने, पुराणे ऐकूण लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आलेला होता. घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन- वाचन-जमाखर्च ह्यांचे शिक्षणही त्यांना अपरिहार्य होते.

लहानपणी चेंडूफळी, हुंबरी, हुतूतू, विटीदांडू इं. अनेक खेळ ते खेळले असावेत. टिपऱ्या, हमामा, फुगड्या इ. खेळही त्यांनी रस घेऊन पाहिले असावेत. क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग त्यांनी रचिले आहेत. ' तुकाराम महाराजांच्या गाथेइतके खेळांचे वैविध्य अन्य संतांच्या गाथांत आढळत नाही.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला; परंतु त्यांची पहिली पत्नी रखमाई ही अशक्त आणि आजारी असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खेड येथे