व्यक्ती, संस्था, कार्य-सूची ५९७
त्यांनी जातपात, उच्चनीच भेद नाकारले. विष्णुदास जन्म घेतात तेच पवित्र कुळ आणि तोच पवित्र देश अशी त्यांची भूमिका होती. सामान्य लोकांना उचित साधनमार्ग दिला पाहिजे. भुताखेतांची साधना, जटाभार वाढविणारे ढोंगी, शकुन सांगणारे भविष्यवादी, क्षुद्र देवतांच्या उपासना ह्यांपासून लोकांना दूर केले पाहिजे, असे त्यांना वाटे. सगुण-निर्गुण हे एकाच आध्यात्मिक साक्षात्काराचे पैलू आहेत; वासना संपूर्ण विलीन होऊन पूर्ण व अविचल स्थिती अनुभवणे हे त्या साक्षात्काराचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंग-गाथेने अढळ स्थान मिळविले आहे. साधकदशेतील ' मनासी झालेले संवाद ” व “नाना बुद्धीचे तरंग ' उत्कटपणे तुकोबांनी व्यक्त केले. संसारातील काही प्रसंग, जनात आलेले अनुभव, अभंगरूप वर्णने त्यांच्या गाथेत आढळतात. संसारी लोकांना केलेला नीत्युपदेश व समाजातील सांगाढोंगावर केलेला प्रहार हेही त्यांच्या अभंगवाणीचे मोठेच विषय आहेत. तिच्यात लौकिकाच्या नाना क्षेत्रांतील उपमारूपकादी अलंकारांचा मार्मिक वापर आढळतो. ही अभंगवाणी सुभाषितात्मक वचनांनी नटलेली आहे. ती मराठी भाषेचेच एक अंग बनली असून जनसामान्यांच्या तोंडी कायमची स्थानापन्न झाली आहे. आधुनिक मराठी कवींना ही उत्स्फूर्त, उत्कट अल्पाक्षसुंदर अभंगवाणी स्फूर्तिदायक ठरली व अनुकरणीय वाटली. मराठी काव्याचे ती एक शाश्वत भूषण होय."
तुकारामांच्या “ आचरण पद्धतीला अत्युच्य तत्त्वज्ञानाचा, अत्यंत गंभीर दर्शनाचा दर्जा देणारी त्यांची दोन वचने फार महत्त्वाची वाटतात. त्या दोन्ही वचनांचा
आशय परस्परांना पोषक, पुरक आहे. मन हेच गुरू आणि मन हेच शिष्य, हे
त्यापैकी एक वचन होय. मला मीच व्यालो आणि मी स्वतःच्या पोटाला आले,
हे त्यातील दुसरे विधान होय, ......... मनुष्याच्या ' स्व ' च्या गाभ्यातून उत्सफूर्तपणे उसळून येणाऱ्या दुसऱ्याच काही घटकांमुळे तो आपल्या अत्युच्य ध्येयापर्यंत पोचत असतो............. त्याच्या मनाच्या अणू-अणूमध्ये एक स्थित्यंतर - घडते. त्याच्या अंतरंगाच्या पेशीपेशीमध्ये एक रुपांतर घडते. त्याच्या अस्तित्वाची जणू काही एक पुनर्रचना होते. त्याच्या व्यक्तित्वाचा जणू काही पुनर्जन्म होतो. यातूनच त्याची मूल्ये निश्चित होतात, मार्ग पक्का होतो. ध्येयनिष्ठा स्थिरावते. |
१ : मराठी विश्वकोश : ७, पृ. ३९१-३९३.
२ : साळुंखे, पृ. १४३.