५९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लेखणे ही नीती आणि हीच खरी पुजा ही त्यांची ü सर्व प्राण्यांना समान
भूमिका हा धर्माच्या क्षेत्रातील पवित्रम विचार म्हटला पाहिजे.”
स्वामी दयानंद सरस्वती :--(१८२४-१८८३) आर्यसमाजाचे संस्थापक व हिंदुधर्मोद्धारक, मोरबी संस्थानातील औदिच्य ब्राह्मण कुलात जन्म. मूळ नाव मूलशंकर, ब्रह्मचारी राहून वेदाध्ययन करण्यासाठी स्वामी पूर्णानंद नावाच्या विद्वान महाराष्ट्रीय संन्यासाकडून संन्यास-दीक्षा. ' स्वामी दयानंद ' हे नाव धारण करून वैदिक ज्ञानाचे अज्वल स्वरूप लोकांपुढे मांडले, प्रचलित मूर्तिपूजेविरुद्ध प्रखर मत मांडले, गोवधाविरुद्ध उग्र चळवळ केली. शुद्धी चळवळीचा फार मोठा प्रयत्न केला. १० एप्रिल १८७५ ला आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थप्रकाश, वेदांवरील भाष्ये इत्यादि ग्रंथ लिहिले. वेदांमध्ये सर्व काही आहे हे अतिशयोकितिपूर्ण मत प्रतिपादताना अगदी अलीकडील शास्त्रीय शोधही त्यात आहे हे सिद्ध करण्यासाठी वेदांतील ऋचांचा विक्षिप्त अर्थ लावीत. हिंदुस्थानला वैदिक मार्गाने जाऊनच उद्धार करता येईल हे सांगताना युक्तिवाद लटपटीत असत. वक्तृत्वाच्या जोरावर ते अनेक धाडसी विधाने बिनधास्त करीत. न हु |
नरीमन, खुरशेद फ्रामजी :-(१८८५-१९४९) एक पारशी हिंदी पुढारी. तरुणांच्या चळवळी चालविण्यात पुढाकार. मुंबई प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अनेक वर्षे अध्यक्ष. गांधींच्या अगोदर ६ एप्रिल १९३० ला मिठाचा सत्याग्रह. पं. मोतीलाल नेहरू कमिटीच्या योजनेला विरोध. अनेक वर्ष मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशनचे तसेच मुंबई कायदेमंडळाचे सभासद.
* नानक (१४६९-१५३९) :--शीख धर्माचे संस्थापक, जन्म तलवंडी .राईबोई
या गावी. त्यांचे मूळ नाव नानकन साहिन. वडिलांचे नाव कालीयानदास
बेदी. हे त्या गावचे कुळकर्णी (Aen) होते. त्यांची पत्नी श्रीतृप्ता ह्या होत. हिंदू पंडित आणि मुसलमान मुल्ला यांच्याजवळ नानक यांचे शिक्षण झाले. ऐहिक व्यवहारापेक्षा धार्मिक व्यवहाराकडे त्यांचा लहानपणापासूनच ओढा. यांचा विवाह सुलखणी हिच्याबरोबर झाला. पण त्यांचे लक्ष संसारात नव्हते. हिंदु व इस्लामी धर्माचे शिक्षण घेऊन त्यांनी भक्तिमार्ग, मोक्ष वगैरे बाबीसंबंधी सूक्ष्म विचार केला. जगातील सर्व मानव हे एकाच परेश्वराची मुले होत व ते परस्परांचे बंधू होत. हा बंधुभाव लक्षात घेऊन सर्व धर्मीय वागू लागले तर जगात द्वेष, वैर, कलह राहणार नाही. या विचारामुळे भारुन, तो
7
१ : तत्रैव पृ. १०७.