व्यक्ती, संस्था, कार्य-सूची | | ५९९
भारतात प्रसृत करण्यासाठी त्यांनी भारतात सर्व प्रमुख भागात दौरा काढला. त्यांच्याबरोबर हिंदू धर्माचे संत व मुसलमान धर्माचे फकीर होते. मथुरा, काशी, जगन्नाथपुरी, मलबार, कोकण, मुंबई, राजस्थान, सिलोन, लडाख, नेपाळ, मक्का, मदिना वगैरे ठिकाणी जाऊन तेथील लोकांना उपदेश केला. ईश्वराचे चिंतन व नामस्मरण करीत असतांना नानक यांना जी दृश्ये दिसत व ज्या सद्भावना मनात उत्पन्न होत, त्यांना त्यांनी अक्षरबद्ध करुन ठेवले. ही अक्षरबद्ध स्त्रोत्रे पुढे एकत्र करुन लिहून काढली. त्या ग्रंथाला (qe आदिग्रंथ किंवा ग्रंथसाहेब हे नाव मिळाले. परमेश्वर अवतार घेतो यावर त्यांचा विश्वास नव्हतां. नानक यांची प्रवचने ऐकून हजारो हिंदू व मुसलमान त्यांचे शिष्य झाले. या शिष्यांना संत्संग हे नावे दिले.
ते महामानव कबीरांना आपले अध्यात्मिक मार्गदर्शक समजत होते. त्यांच्यावर बुद्ध व मो. पैगंबर याच्या तत्त्वज्ञानाचा पगडा असल्याचे स्पष्ट दिसते. ते पुरोहितांच्या कर्मकांड, अंधश्रद्धा, जातियता, अवास्तविक धार्मिक अवडंबर व प्रथा, मुर्तिपूजा यांच्या विरोधी होते. त्यांचा प्रामाणिकपणा, सदाचारी जीवन, विनय, दया, उदारपणा, सत्य इत्यादी मानवी मूल्यांवर पूर्ण विश्वास होता. यामुळे त्यांनी शील व कृतीची शुद्धता आणि नैतिकतेच्या नियमावर विशेष भर दिला. गुरुनानकांच्या या मानवी विचारधारेमुळे ब्राह्मणवादी समाज व्यवस्थेचे मानेवर जोखड असलेल्या बहुतांश शुद्रातिशुद्रांनी शिख धर्माचा स्वीकार केला. आज शीख धर्माचे भारतीय जीवनात प्रमुख स्थान आहे.
नायर, डॉ. तारावत माधवन :-(१८६८-१९१९) जन्म तिरूर येथे. शिक्षण प्रेसिडेन्सी महाविद्यालय व मद्रास मेडिकल महाविद्यालयामध्ये, पुढे चालून प्रख्यात डॉक्टर, नामवंत प्राध्यापक, झुंजार पुढारी, धैर्यशाली समाज सुधारक व एक निर्भय राजकारणी पुरुष म्हणून कीर्ती. दक्षिणेतील ब्राह्मणेतर चळवळीचे अध्वर्यु. मद्रासच्या विधिमंडळात सभासद. ' अँटीसेप्टीक ' नावाच्या वैद्यकीय नियतकालिकाचे संपादक. जातिभेदाची उच्चनीचता पाळणाऱ्या ब्राह्मणांच्या हाती माँटफर्ड सुधारणा राबविण्याची सत्ता गेली तर [मनुस्मृतीतील ] [निर्बधच ] सुधारून नि अद्यावत करून पुन्हा नव्या स्वरूपात मनूचे निर्बंध [सर्व ] [हिदूंना ] [लागू ] करण्यात येतील असे त्यांचे ठाम मत होते.
नॉर्डिक वंश :-नॉर्डिक वंश हाच जगातील सर्व श्रेष्ठ वंश आहे. अन्य वंशांतील लोक हे दुय्यम दर्जाचे मानव आहेत व त्यांच्यावर राज्य करण्याचा नॉर्डिक वंशाचा म्हणजे जर्मनांचा ते श्रेष्ठ वंशीय असल्यामुळे हक्कच आहे, हा