६०० डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
हिटलरचा सिद्धांत होता. या नॉर्डिक वंशालाच हिटलर आर्य वंश म्हणत असे. भिन्नभिन्न मानव वंशांत समानता मानणे हा त्याला गुन्हा वाटे, वंशावंशातील समानतेप्रमाणेच मानवा-मानवांतील समता हाही हिटलरच्या दृष्टीने भयंकर गुन्हा होता. मानव समाजांतील व व्यक्तीतील असमानता, भिन्नता हाच हिटलरच्या वंशसिद्धांताचा अर्थ होता.
नेहरू, पं. मोतीलाल :-(१८६१-१९३१) हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध राज्य घटनाशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, मुत्सद्दी व वादविवादपटू. काश्मिरी ब्राह्मण. परंतु अलाहांबादमध्ये कायम वास्तव्य, तीन महिन्याचे असतानाच वडिल वारले. संगोपन वडील भावाने केले तेही वकील होते. यांनी हायकोर्ट वकिलीची परीक्षा देऊन सुवर्णपदकही मिळविले व वकिली सुरू केली. खूप पैसा मिळवावा, अत्यंत ऐषारामात राहावे व प्रसंगी प्रागतिकांच्या राजकारणात भाग घ्यावा, असा यांचा तेव्हां कार्यक्रम असे. पण म. गांधींच्या राजकारणाने हे भारले गेले आणि चढाईच्या राजकारणात दाखल झाले. पंजाब प्रकरणाबाबत चौकशी करण्याकरिता weet नेमलेल्या कमिटीवर काम केल्यानंतर यांची अमृतसर राष्ट्रसभेचे अध्यक्ष म्हणून निवडणूक झाली (१९१९). पुढे असहकारितेच्या चळवळीतही ते सामील झाले. स्वराज्य पक्षाची स्थापना केली. दिल्लीच्या मध्यवर्ती कायदेमंडळात हे पक्षाचे पुढारी म्हणून निवडले जाऊन यांनी आपल्या वादविवादकौशल्याने सरकारला हादरून सोडलें. साम्राज्यान्तर्गत स्वराज्याची यांची राष्ट्रसभेने मान्य केलेली योजना “नेहरू
रिपोर्ट ' या नावाने प्रसिद्ध.
पटेल, वल्लभभाऔ जब्हेरभाई :-(१८७५-१९५०) सरदार वल्लभभाई पटेल म्हणून प्रसिद्ध. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व काँग्रेसचे एक प्रमुख पुढारी. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियाड गावी जन्म. इग्लंडमधील मिडलटेंपलमधून बॅरिस्टर होऊन आल्यावर वकिली करीत असताना गांधींच्या स्वराज्य चळवळीत भाग. अनेकदा तुंरुगवास,. १९३१ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, करडेपणाच्या व करारीपणाच्या वृत्तीचा लोकमतावर मोठा परिणाम. त्यांच्या कडक धोरणामुळेच हैद्राबाद संस्थान मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील होऊ शकले. त्यामुळेच त्यांना पोलादी पुरुष म्हटले गेले.
प्रार्थना समाज, मुंबई :--महाराष्ट्रात १८६७ मध्ये स्थापन झालेला एक धर्मपंथ. प्रत्येक धर्मात कमीअधिक प्रमाणात सत्याचा लोप झालेला असतो किंवा धर्मविकास थांबला असतो तेव्हा विवेचक बुद्धीने सर्व धर्मामधील सत्य