व्यक्ती, संस्था, कार्य--सूची ६०१
तेवढे ग्रहण करावे, देशकालपरत्वे धर्मप्रवृत्तीत असत्याचा अंश त्यागावा व जागृत विवेक बुद्धीने उन्नतीकारक मतांचे अवलंबन करावे हा प्रार्थना-समाजाचा मूळ उद्देश. षड्रिपूंचे उच्चाटन होण्याकरिता प्रार्थना आहे हे जाणून प्रार्थना- समाज प्रार्थनेवर जोर देतो. राजा राममोहन रॉय यांनी कलकत्त्यास स्थापन केलेल्या ब्राह्म-समाजाच्या धर्तीवरच प्रार्थना-समाजाची प्रथम मुंबईस स्थापना झाली. त्याचे प्रर्वतक डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, रमाबाऔ रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, वासुदेव बाबाजी नवरंगे, रामचन्द्र विष्णु माडगावकर, बाळ मंगेश वागळे, भास्कर हरि भागवत, वामन आबाजी मोडक, शंकर पांडुरंग पंडित, दिनानाथ विष्णु माडगावकर, नारायण गणेश चंदावरकर ही मंडळी होती. ह्या समाजातर्फे १८७३ पासून ' सुबोधपत्रिका ' हे साप्ताहिक सुरू केले गेले. द्वा. गो. वैद्य यांनी प्रार्थना-समाजाचा इतिहास लिहिला आहे.
बजाज, शेठ जमनालाल :--(१८८९-१९४२) व्यापारी वर्गातील एक सार्वजनिक कार्यकर्ते. वर्धा येथील शेठ बच्छराज यांनी १८९४ मध्ये आपला नातू म्हणून दत्तक घेतले. शिक्षण शाळेत किंवा विद्यापीठात झाले नाही. गांधीजी, विनोबा भावे व श्रीकृष्णदास जाजू यांच्या सहवासामुळे मनावर सुपरिणाम होऊन राष्ट्रकार्याकडे ओढा. रावबहादूर पदवीचा त्याग करुन काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग, स्वमालकीचे लक्ष्मीनारायण मंदिर १९२८ साली अस्पृश्यांसाठी खुले केले. अशा प्रकारचे अस्पृश्यांसाठी खुले केलेले हिंदुस्थानातील हे पहिलेच मंदिर होते. ते कर्ते सुधारक होते. १९२० पासुन राष्ट्रीय सभेचे खजिनदार होते. म. गांधीजींचे उजवे हात म्हणून प्रसिद्ध.
बसवेश्वर :— बिज्जल हा बाराव्या शतकात होऊन गेला. तों कर्नाटकाचा राजा होता. त्याचा प्रधान बसव. बसव जातीने ब्राह्मण होता. त्यावेळी हिंदुधर्म व जैनधर्म यांचे प्राबल्य होते. बिज्जल राजा हा जैनधर्मी होता. बसव शूर, धोरणी, पण भक्तिप्रधान माणूस होता. हिंदू धर्मातील व जैन धर्मातील त्यावेळचे रुढाचार पाहून तो दुःखी झाला. या दोन्ही धर्मात त्याला हेच दिसले की, बहुजन समाजाची दैन्यावस्था आणि पुरोहित वर्गाची चंगळ ! श्री. बसव यांनी वेद, वेदांगे, श्रुति, स्मृति, पुराणे, ह्यावर प्रचंड हल्ले चढविले. त्याचप्रमाणे त्याने ब्राह्मणी वर्चस्व, जातिभेद आणि पूजा-अर्चा व इतर धार्मिक विधी यांच्याविरुद्ध बंड उभारले व नवीन धर्माची-लिंगायत-स्थापना केली. श्री. बसवाच्या लिंगायत धर्मात बहुजन समाजाचे व ब्राह्मण समाजाचेही लोक आले. (The Lingayat Movement, p.20).