डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ६०२
क्षेत्राचे शुद्धीकरण करण्याचा “ त्यांनी धार्मिक व सामाजिक क्रांतीद्वारे मानव
अंधश्रद्धा, चातुर्वर्ण्य यास कडाडून प्रयत्न केला. त्यासाठी कर्मकांड, यज्ञयाग,
प्रारब्ध, परलोक, परदेव विरोध केला. पुरोहितवाद, तीर्थयात्रा, ग्रंथपूजा,
परतत्व, यावर विश्वास ठेवून निष्क्रीय बनलेल्या समाजाला सक्रीय करण्याचे कंकण बांधले. उद्योग हाच कैलास आहे. प्रत्येक उद्योग कैलासाएवढे पवित्र आहेत. त्यात उच्चनीचतेचा भेद नाही. असे सांगितले ......, ' सदाचार हाच स्वर्ग व अनाचार हा नरक आहे ' असे संबोधून वास्तववाद प्रगट केला.”
५ बसव यांना जातिभेदाचा लहानपणापासून तिरस्कार होता. जातिभेदाचे थोतांड . नष्ट करण्याकरिता त्यांनी लहानपणापासून कार्य हाती घेतले. “बसवेश्वरांचे चरित्र इ.स. १३६९ च्या सुमारास रचिलेल्या ' बसवपुराण ' नामक ग्रंथात गुंफिले असून त्याच्या तिसन्या भागात असा वृत्तांत दिला आहे की, बसव हा ब्राह्मणपुत्र असल्यामुळे त्याच्या मुंजीचा बेत ठरला. त्यावेळी ' मी ब्राह्मण नाही ' असे म्हणून त्याने मुंज करण्याचे साफ नाकारले !' (विचारसमीक्षा, पा ५३). जातिभेदाचे थोतांड नष्ट करण्यासाठी बसवेश्वरांनी आमरण चळवळ केली व कष्ट केले. परंतु जातिभेदाची कल्पना समाजातून नष्ट करण्यात त्यांना यश आले नाही. याचे कारण हे की, हिंदुधर्मातील अवतार, पूर्वजन्म, कर्मवाद, मोक्ष, नरकयातना, मायावाद, इत्यादी शिकवणीची लोकांच्या मनावर पडलेली कायमची छाप ! कालांतराने बसवेश्वराच्या अनुयायांनी लिंगायत धर्मातही जातिभेदाचे रोप रुजू दिले आणि लिंगायतांमध्ये जातिभेदाचे जाळे
कायमचे पसरले गेले.” २
बाळाजी बाजीराव :-(१७२१-१७६१) थोरल्या बाजीरावाचा मोठा मुलगा (नानासाहेब) साते येथे जन्म. बाजीरावानंतर याच्याइतका योग्य दुसरा पुरुष न दिसल्यामुळे शाहूने याला पेशवे पद दिले. १७३९ मध्ये झालेल्या मिरजेच्या
स्वारीत शाहूबरोबर होता. १७४०-१७४८ पर्यंत सुरज भेलसे, माळवा, गुजराथ, बंगाल, प्रयाग, भेलसे, कर्नाटकची पहिली लढाई इ. लढाया याने केल्या. पुढे
शाहूने याच्या स्वाधीन राज्याची सर्व सूत्रे केली (१७४९). पुढे कोल्हापूरच्या
ताराबाईचा नातू राजाराम यास गादीवर बसविले. १७५१ मध्ये निजामचा
पाडाव केला. १७६१ मध्ये पानिपतावर मराठ्यांचा जो भयंकर संहार झाला
त्यामुळे जबर धक्का बसून १८ जून १७६१ रोजी पुण्यास मरण पावला. हा
उत्तम संस्कृततज्ञ, कलमबहाद्रर, धोरणी व अत्यंत हिशोबी होता.
१; मोगलेकर, डॉ. पृ. ४३.
२ : खैरमोडे, खंड १ ला, पृ. ११६-११७.